'मी तर गावचा पाटील, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो', पण... चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 03:10 PM2022-02-21T15:10:13+5:302022-02-21T15:11:03+5:30

संजय राऊत यांच्यासारखी शिवराळ भाषा वापरणे माझी संस्कृती नाही

I can speak worse than village Patil Sanjay Raut Chandrakant Patil reply | 'मी तर गावचा पाटील, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो', पण... चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

'मी तर गावचा पाटील, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो', पण... चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

Next

पुणे : महाराष्ट्रातील राजकारणात आरोप - प्रत्यारोप यांचा खेळ सुरु झाला आहे. भाजप आणि शिवसेना या पक्षातील नेते एकमेकांवर वाईट भाषेत टीकाही करू लागले आहेत. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करून राजकीय नेते आरोप करण्यातच व्यस्त असल्याचे दिसू लागले आहे. किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या आरोपांच्या चर्चेला तर उधाणच आलय. त्यातच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याबाबत बोलताना शिवराळ भाषा वापरली आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व नेत्यांकडून राऊतांवर टीका होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिल आहे.   

“मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.'' संजय राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना समोरच्याला कोणती भाषा कळते, त्या भाषेत आपण बोलतो, त्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी पाटील यांनी उत्तर दिलं आहे. 

पाटील म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते. व आता भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून पक्षाला ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाच.         

Web Title: I can speak worse than village Patil Sanjay Raut Chandrakant Patil reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.