पोलीस इतका शोध घेतील असे वाटले नव्हते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:04 AM2020-11-27T04:04:48+5:302020-11-27T04:04:48+5:30
आपण महाराष्ट्राबाहेर होतो़ तसेच बरोबर मोबाईल अथवा कोणाशी संपर्क नसल्याने आपला इतका ठिकाणी शोध घेतला जात असल्याचे समजले नसल्याचे ...
आपण महाराष्ट्राबाहेर होतो़ तसेच बरोबर मोबाईल अथवा कोणाशी संपर्क नसल्याने आपला इतका ठिकाणी शोध घेतला जात असल्याचे समजले नसल्याचे त्यांनी सांगितले़
पोलिसांनी दिला मानसिक आधार
कपिल पाषाणकर यांनी सांगितले की, वडिल निघून गेल्यावर पोलिसांनी विशेष पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी मोठा मानसिक आधार दिला़
यासंबंधिता एका राजकीय व्यक्तीचा हात असल्याचे सांगितले जात होते़ त्याविषयी कपिल पाषाणकर यांनी सांगितले की, वडिल निघून गेल्यानंतर आम्ही सर्व गोष्टीचा विचार केला़ त्यांचे मोठ्या लोकांशी व्यवहार होते़ त्यांना कोणी त्रास दिला़ रस्त्यात गाडी अडविणे, असे प्रकार घडले होते़ त्यातून संबंधित व्यक्तीला फोन केला़ तेव्हा त्याने आपण मंत्रालयात असून अजून ३ दिवस तिथेच असणार आहे, असे उत्तर दिले होते़ त्यामुळे तपासाच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांना भेटून अर्ज दिला होता़ परंतु, आता वडिलांशी चर्चा केल्यावर त्यांच्या निघून जाण्यामध्ये असे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले़
पोलिसांची धावपळ
या सर्व प्रकारात शहर पोलीस दलाची चांगलीच धावपळ झाली़ शिवाजीनगर पोलिसांचे पथक, गुन्हे शाखेच्या युनिट-१चे पथक महिन्याभर त्यांच्या कोल्हापूरसह कोकणात शोध घेत होते़ अधिकारी व कर्मचारी असे १५ जणांचे पथक अनेक ठिकाणी जाऊन शोध घेऊन आले होते़ त्याशिवाय कोल्हापूरसह कोकणातील स्थानिक पोलिसांची याकामी मदत घेण्यात आली होती़