‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 20:11 IST2024-12-13T20:10:51+5:302024-12-13T20:11:49+5:30
संकल्प गोळे व कुटुंबियांविरोधात बारामतीत कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल

‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल
बारामती - मला आमदार झाल्यासारखं वाटतय या गाण्याचे गायक संकल्प अजाबराव गोळे (रा. अद्विका रेसिडेन्सी, पुणावळे, पिंपरी-चिंचवड, पुणे ) यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी त्यांची पत्नी मिनल संकल्प गोळे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.या फिर्यादीनुसार त्यांचे पती संकल्प गोळे, सासू शोभा अजाबराव गोळे, सासरे अजाबराव मारुती गोळे, नणंद समिक्षा अजाबराव गोळे, दिक्षिता स्वप्निल जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार ५ फेब्रुवारी २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
मिनल व संकल्प यांचा विवाह काळज (ता. फलटण, जि. सातारा) येथे ५ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. लग्नानंतर एक महिना संसार व्यवस्थित सुरु होता. परंतु त्यानंतर पती संकल्प हे दारु पिवून येत तिच्यावर संशय घेवू लागले. तु काम व्यवस्थित करत नाही, तु कोणाबरोबरही चॅटींग करते, बोलते. तुला घरकाम येत नाही. तु तुझे बारामतीतील मेडिकल शाॅप बंद करून पुणे येथे सुरु कर अन्यथा तुला नांदवणार नाही, असे ते म्हणत. शिवाय तुला नांदवायचे नाही, तु मला घटस्फोट दे असे म्हणत तिला हाताने मारहाण, शिविगाळ, दमदाटी केली जात होती. सासू शोभा यांनी तु मला उलट बोलतेत, तुला नांदवायचे नाही असे म्हटले. तर समिक्षाच्या लग्नासाठी दहा तोळे दागिने माहेरहून आण अशी मागणी सासूने केली. सासरे यांनीही मेडिकल शाॅप पुण्यात सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आण असे म्हणत उपाशीपोटी ठेवून शारिरिक व मानसिक छळ केला.
नणंद समिक्षा व दिक्षिता यांनीही सतत शिविगाळ, दमदाटी केली. लग्नावेळी घातलेले दागिने सासरच्या मंडळींनी काढून घेत तिला फेब्रुवारी २०२४ मध्ये राहत्या घरातून हाकलून दिले. त्यामुळे फिर्य़ादी या बारामतीत बहिणीच्या घरी राहत असल्याचे फिर्य़ादीत नमूद करण्यात आले आहे.