अरबांच्या ‘दिरहम’ ऐवजी मिळाला धुण्याचा साबण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:12 AM2021-09-21T04:12:15+5:302021-09-21T04:12:15+5:30

पुणे : युनायटेड अरब अमिराती (यु ए ई) देशाचे चलन दिरहम हे स्वस्तात विकत घेण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच ...

I got washing soap instead of Arab dirhams | अरबांच्या ‘दिरहम’ ऐवजी मिळाला धुण्याचा साबण

अरबांच्या ‘दिरहम’ ऐवजी मिळाला धुण्याचा साबण

googlenewsNext

पुणे : युनायटेड अरब अमिराती (यु ए ई) देशाचे चलन दिरहम हे स्वस्तात विकत घेण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडला. त्याचे २ लाख रुपये गेलेच, पण चलनाऐवजी धुण्याच्या साबणाचा गोळा हातात पडला.

या प्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या एका २८ वर्षाच्या तरुणाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादीला दोघाजणांनी कमी किमतीत युएईचे चलन देण्याचा बहाणा केला. त्यानुसार त्यांना २ लाख रुपये घेऊन अप्पर कोंढवा रोडवरील जगताप डेअरी येथील साईनगर गल्लीत बोलविले. त्यानुसार १६ सप्टेंबरच्या रात्री साडेसात वाजता पैसे घेऊन तेथे गेले. त्यांच्याशी मोबाईलवर बोलणारा एक जण व त्याचा साथीदार तेथे आला. त्यांनी फिर्यादीकडे नायलॉनची पिशवी दिली. त्यांनी नायलॉनच्या पिशवीतील गठ्ठा सोडून पाहण्याचा प्रयत्न करताच त्यांच्या हातातून ५०० रुपये व २ हजार रुपयांची नोटा असलेली २ लाख १ हजार रुपये रोख रक्कम असलेली प्लास्टिकची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यांना हाताने धक्का देऊन जमिनीवर पाडून ते पळून गेले.

फिर्यादीने नायलॉनच्या पिशवीतील गठ्ठा उघडून पाहिला असता त्यात कपडे धुण्याच्या साबणाला गोलाकार देऊन त्यावर इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र गुंडाळून रुमालाने बांधलेला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरही ते घाबरले असल्याने त्यांनी तक्रार दिली नव्हती. शेवटी काल त्यांनी तक्रार दिल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: I got washing soap instead of Arab dirhams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.