...मी काहीच चुकीचे बोललो नाही : भरणे
By admin | Published: May 9, 2017 03:26 AM2017-05-09T03:26:52+5:302017-05-09T03:26:52+5:30
तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना समजावताना जे बोललो, ते योग्यच होते. मात्र, बोलताना
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले : तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना समजावताना जे बोललो, ते योग्यच होते. मात्र, बोलताना शिवराळ भाषा जास्त वापरल्याने त्या विषयाची चर्चा जास्त झाली. नाही तर मी काहीच चुकीचे बोललो नाही, अशी कबुली आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
अकोले वनक्षेत्रात रोटरी क्लब भिगवणच्या वतीने वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडण्यासाठी भरणे आले होते. या वेळी ते बोलत होते.
भरणे म्हणाले, ‘‘मागील २० वर्षांत तालुक्याचा काहीच विकास झाला नसल्याने आजही अवस्था झाली आहे. पावसाळ्यात उजनी धरणात सोडण्यात येणारे पाणी जर तलाव भरण्यासाठी वापरले असते तर ही वेळ आली नसती. मात्र, मी एकटाच या गोष्टीला जबाबदार
नाही. विरोधकांनी तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे खापर आमदारांवर फोडून मोकळे
व्हायचे. मात्र, मी एक ते दोन वर्षांत भरपूर कामे केली. ज्यांना वीस वर्षे सत्तेत राहून तालुक्याचा विकास करता आला नाही. त्याबद्दल तर मी शिवराळ भाषा वापरली, असा टोला भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला