मला तुम्ही खूप आवडताय, जरा माझ्याजवळ पुढे बसायला या ना' ,रिक्षाचालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग
By नम्रता फडणीस | Updated: October 17, 2023 16:27 IST2023-10-17T16:26:31+5:302023-10-17T16:27:33+5:30
महिलेने आरडाओरडा केल्यावर तिला रस्त्यात सोडून रिक्षाचालक पसार

मला तुम्ही खूप आवडताय, जरा माझ्याजवळ पुढे बसायला या ना' ,रिक्षाचालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग
पुणे: 'मला तुम्ही खूप आवडताय, जरा माझयजवळ पुढे बसायला या ना' , असे म्हणत रिक्षाचालकाने प्रवासी महिलेचा विनयभंग केला. ही घटना ओैंध भागात घडली. महिलेचा विनयभंग करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रिक्षाचालक रियाज समाद शेख (रा. बोपोडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ओैंधमधील ब्रेमेन चौकातून रिक्षाने निघाली होती. तिला खडकी परिसरात जायचे होते. आरोपी रिक्षाचालक शेखने आरशातून महिलेकडे पाहून तिला डोळा मारला. तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला. रिक्षाचालक शेखने रिक्षा थांबविली. महिलेला रस्त्यात सोडून रिक्षाचालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.