"मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो" असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिवशाहीरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 01:48 PM2021-08-13T13:48:22+5:302021-08-13T13:52:28+5:30

पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता.

"I salute Babasaheb," said Prime Minister Narendra Modi | "मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो" असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिवशाहीरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

"मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो" असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिवशाहीरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Next
ठळक मुद्देनरेंद्र मोदींबरोबरच दिग्गजांच्या ओनलाईन माध्यमातून शुभेच्छा

पुणे : मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो. त्यांनी शिवाजी महाराजांचा जो आदर्श उभा केला आहे आणि जी शिकवण दिली आहे. त्याचे आचरण करण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी अशी प्रार्थना मी देवाकडे करतो". अशा शब्दांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात करत बाबासाहेबाना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बाबासाहेबांनी जगभरात पोहोचवला. त्यासाठी आपण सर्व त्यांचे सदैव ऋणी राहू. असेही ते म्हणाले आहेत.  

पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता. या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. 

बाबासाहेबांच्या पुरस्काराचे कौतुक करताना मोदी म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांना देशाने पदमविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तर महाराष्ट्र राज्य सरकराकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मध्यप्रदेशमधील शिवराजजींच्या सरकरने त्यांना कालिदास पुरस्काराने सन्मानित केले. 

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, या विशेष कार्यक्रमात ऑनलाइनच्या माध्यमातून सहभागी होत शिवशाहीरांचे अभिष्टचिंतन केले. तसेच सुमित्रा महाजन, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.  

बाबासाहेब समोर आले की वाकून नमस्कार करण्याची भावना होते - सचिन तेंडुलकर 

लहानपणी शिवाजी महारांजाबद्दल शाळेत गोष्टी ऐकायचो. त्या गोष्टी ऐकल्यावर लढण्याची वृत्ती निर्माण होते, शिवाजी महाराजांवर ८० वर्षे अभ्यास करून शिवचरित्र त्यांनी जगभरात पोहोचविले याचे कौतुक आहे. मात्र एक खंत आहे जाणता राजा कधी बघितले नाही. कामाच्या व्यापात तो योग जुळून आला नाही. बाबासाहेब समोर आले की वाकून नमस्कार करण्याची भावना होते आमची प्रार्थना आहे की तुम्हाला उदंड आयुष्य मिळो.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शंभर वर्षात पदार्पण केले त्यांना दिर्घआयुष्य लाभो, मेगा प्रकल्प म्हणून नावलौकिक असलेला हा शिवसृष्टी प्रकल्प लवकरच पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे..बाबासाहेबांना वयाच्या ८ व्या वर्षापर्यंत शिवचरित्र ऐकून पाठ झाले होते..गडकिल्ल्यांच्या भेटी, माहिती संकलित करणे यातून त्यांनी संशोधन वृत्ती जोपासली. इतिहास त्यांनी मोडून तोडून सांगितला नाही. शिवचरित्र आणि सुराज्य म्हणजे राष्ट्रीय चरित्र असे ते म्हणतात. ते खऱ्या अर्थाने शिवरायांचे आदर्श सेनानी ठरले आहेत.

मोहन भागवत म्हणाले, स्वतःच्या परिश्रमाने त्यांनी शिवचरित्र घराघरात पाहोचवले. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे दैवत. यासाठी त्यांनी गडकिल्ले पालथे घातले. अडचणी आणि संकटावर मात करून शिवचरित्र पोहोचविण्याची तपस्या पार पाडली. प्रेरणास्रोत जीवनाची शंभरी सुरू होत आहे. समर्पण, निष्ठा आणि ध्यासातून त्यांनी समाज मन घडविले आहे.

Web Title: "I salute Babasaheb," said Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.