माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 07:58 PM2019-07-04T19:58:50+5:302019-07-04T20:08:26+5:30

लक्ष्मण माने यांनी बंचित बहुजन आघाडीतून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमाेर आपली भूमिका स्पष्ट केली.

i was suffocating in party ; says laxman mane | माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

Next

पुणे : पक्षाच्या संस्थापक सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. तसेच पक्षात आरएसएसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामाकाजात हाेत असल्याचे निष्पन्न हाेत असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी केला. पक्षात घुसमट हाेत असल्याने मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील माने यांनी पुण्यात माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. 

संभाजी भिडे यांचे धारकरी असलेल्या तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेचे तिकीट दिले. आता तर पक्षाचे महासचिव पद व पक्ष प्रवक्ते पद पडळकर यांना देण्यात आले. तसेच डाॅ. ए. आर. अंजारिया हे आर.एस.एसचे मुस्लिम समाजातील हस्तक व भाजपाचे मुस्लिम आघाडीचे नेते यांना पक्ष संघटनेच्या कार्यकारणीत घेतले. यावरुन आर.एस.एसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामकाजात झाल्याचे निष्पन्न हाेत आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माने यांनी केली. तसेच आपण पक्षाच्या सदसत्वाचा आणि पार्लमेंट्री बाेर्डाच्या सदसत्वाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

माने म्हणाले, आरएसएसचा प्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षामध्ये दिसून येत आहे. आरएसएसमध्ये वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेची उमेदवारी देण्यात आली तसेच त्यांना पक्षाचे महासचिव पद देखील देण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यशैलीबाबत माझे मतभेद आहेत. आंबेडकरांसारखी माझी कार्यपद्धती नाही. माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला बेरजेचं राजकारण करायचं आहे.  प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, त्यांच्याबद्दल मी काही वाईट बाेलणार नाही. परंतु आम्ही एकत्र काम करणं शक्य नाही. लाेकसभेचे सर्व उमेदवार आंबेडकरांनी स्वतःच निवडले. लाेकसभेला आमचे निर्णय चुकले. काॅंग्रेससाेबत आघाडी केली असती तर आमच्या तीन ते चार जागा आल्या असत्या. परंतु लाेकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी आंबेडकरांवर टाकत नाही. ती आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यावेळी मला काही बाेलता आले नाही कारण मी पक्षाच्या चाैकटीत हाेताे. आता मी हे सांगताेय कारण मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. 

मी आता पक्षातून बाहेर पडलाेय. त्यामुळे मी स्वतंत्र वाट निवडणार. भाजप शिवसेनेला मदत हाेईल असे काही करणार नाही. आम्हा वंचितांना सत्तेत जायचे आहे. आंबेडकरांकडे जाऊन देखील सत्तेत जाणार नसू तर आम्ही आमची स्वतंत्र वाट निवडू. यासाठी विधानसभेसाठी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करु तसेच आरपीआयच्या विविध गटांशी देखील चर्चा करु. प्रकाश आंबेडकरांना 248 जागा लढवायच्या असतील तर मी त्यांच्या साेबत जाणार नाही. मी राजकारण लेफ्ट टू दी सेंटर करताे. काॅंग्रेसला 44 जागांची ऑफर देणं हे काॅंग्रेसचा अपमान करणारं आहे. काॅंग्रेसशी मैत्री करायची असेल तर अशी भाषा याेग्य नाही. त्यामुळे आंबेडकरांनी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्या साेबत राहीन असे माने यांनी सांगितले.

एमआयएमचा उपयाेग झाला नाही. 
लाेकसभेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचा उपयाेग झाला नाही असे माने यांनी सांगितले. त्यांचा उपयाेग झाला असता तर साेलापूरातून प्रकाश आंबेडकर निवडूण आले असते. परंतु तसे झाले नाही. असे माने यांनी सांगितले.

...तर प्रकाश आंबेडकरांनी सतरंजा उचलायला सांगितल्या तरी उचलेन
प्रकाश आंबेडकर यांनी सतरंजा उचलायला सांगितल्या तरी उचलेन परंतु त्यांनी तत्त्वाशी तडजाेड करायला नकाे. त्यांनी आघाडीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्यासाेबत राहीन. अशी भूमिका माने यांनी घेतली. 

Web Title: i was suffocating in party ; says laxman mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.