"कसब्यात गुलाल मी उधळणार, २५-३० हजारांच्या मताधिक्यांनी निवडून येणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 02:31 PM2023-03-01T14:31:03+5:302023-03-01T14:32:52+5:30

विजयाचे बॅनर लागल्याने खूप कार्यकर्त्यांचे फोन आले. जेव्हा अधिकृत निकाल येईल त्यानंतर बॅनर लावायला हवेत अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती उमेदवार हेमंत रासनेंनी दिली.

"I will be elected with a majority of 25-30 thousand votes in Kasba Peth Constituency says BJP Candidate Hemant Rasane | "कसब्यात गुलाल मी उधळणार, २५-३० हजारांच्या मताधिक्यांनी निवडून येणार"

"कसब्यात गुलाल मी उधळणार, २५-३० हजारांच्या मताधिक्यांनी निवडून येणार"

googlenewsNext

पुणे - कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास उरले आहेत. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. त्यात भाजपा-शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यात २ पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वी आलेल्या सर्व्हेतून भाजपाला कसब्यात धक्का बसेल असं सांगितले जात आहे. मात्र आपला विजय होणार असा विश्वास कसबा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे. 

हेमंत रासने म्हणाले की, गेली १५-२० दिवस निवडणुकीचा जो प्रचार झाला. शिवसेना-आरपीआय-भाजपाची यंत्रणा कार्यरत होती. आम्ही शेवटच्या माणसांपर्यंत पोहचलो. केंद्र आणि राज्य सरकार विकासकामे हे पाहता जनतेचा आशीर्वाद मला १०० टक्के मिळाला आहे. चांगल्या मताधिक्यांनी माझा विजय होईल. साधारण २५-३० हजारांचे मताधिक्य असू शकते. आम्ही बूथपासून काम केले आहे. कुठे किती मतदान झाले. पारंपारिक मतदारांना बाहेर आणण्यात कार्यकर्ते यशस्वी झालेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच विजयाचे बॅनर लागल्याने खूप कार्यकर्त्यांचे फोन आले. जेव्हा अधिकृत निकाल येईल त्यानंतर बॅनर लावायला हवेत. २ तारखेला लागलेला निकालाचे बॅनर पुढे कायम राहील. खूप जणांनी बॅनरबाजी केलीय त्यांचे काय झाले हे माहिती आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही बॅनर लावू नका अशा सूचना दिल्या आहेत. निकालानंतर बॅनर लागले तर ते लोकशाहीला धरून होईल. उद्या दुपारी २ वाजेपर्यंत माझ्या अंगावर गुलाल लागलेला असेल असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला. 

Exit Poll आले! कसब्यात भाजपाला धक्का बसण्याचा अंदाज
पुण्यातील कसबा पेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला होता. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे अशी लढत पाहायला मिळत आहे. रिंगसाईड रिसर्च आणि स्ट्रेलिमा संस्थेने एक्झिट पोल वर्तवला आहे. 
स्ट्रेलिमा संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, कसब्यात भाजपला धक्का बसू शकेल. या ठिकाणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून, काँग्रेसचे रविंद्र धनगेकर हे सुमारे १५,०७७ मताधिक्यांनी विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कसबा पेठ येथे हेमंत रासने यांना सुमारे ५९,३५१ मते तर, रवींद्र धंगेकर यांना सुमारे ७४,४२८ मते पडू शकतात, असे एक्झिटपोलमध्ये म्हटले आहे. 

Web Title: "I will be elected with a majority of 25-30 thousand votes in Kasba Peth Constituency says BJP Candidate Hemant Rasane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.