"मानसिक संतुलन बिघडल्याने मी स्वतःला संपविणार" पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचे कुलगुरूंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 02:00 PM2023-07-04T14:00:31+5:302023-07-04T14:03:39+5:30

सुशांत शेवाळे नावाच्या विद्यार्थ्याने हे पत्र कुलगुरुंना लिहले...

I will kill myself due to mental imbalance, Pune University student's letter to the Vice-Chancellor | "मानसिक संतुलन बिघडल्याने मी स्वतःला संपविणार" पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचे कुलगुरूंना पत्र

"मानसिक संतुलन बिघडल्याने मी स्वतःला संपविणार" पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचे कुलगुरूंना पत्र

googlenewsNext

पुणे :टीसीवर रेड रिमार्क दिल्यामुळे विद्यार्थ्याने थेट कुलगुरू यांना दिले आत्महत्या करणार असल्याचे पत्र लिहले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी यांना या विद्यार्थ्याने पत्र दिले. सुशांत शेवाळे नावाच्या विद्यार्थ्याने हे पत्र कुलगुरुंना लिहले आहे. 

पत्रामध्ये नमूद केलेल्या मजकूरावरून आणि मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत हा पुण्यातील लीलावती कॉलेज ऑफ कॉमर्स आणि कॉम्प्युटर स्टडीज या ठिकाणी शिकत होता. परीक्षा देऊन सुद्धा कॉलेजने निकाल लवकर दिला नाही. काही दिवसांनी त्याला कॉलेजने त्याचा निकाल हाती दिला. मात्र कॉलेज सोडून जाताना टीसी देताना कॉलेजने टीसी वर "misbehaviour" असा शेरा दिला. परिणामी पुढे कुठेही शिक्षण घेण्यासाठी अडचण येत असल्याने हताश झालेल्या या तरुणाने कुलगुरू यांना याप्रकरणी दखल घ्यावी यासाठी पत्र लिहले आहे. मानसिक संतुलन ठीक नसल्याने योग्य दखल घेतली नाही तर आत्महत्या करेल आणि जबाबदारी कॉलेजची असेल असे देखील या तरुणाने त्याच्या पत्रात लिहले आहे.

Web Title: I will kill myself due to mental imbalance, Pune University student's letter to the Vice-Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.