'मैं तुझे जिंदा छोडूंगा नहीं..! दारु पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या गळ्यावर कटरने वार
By नम्रता फडणीस | Updated: July 23, 2024 16:16 IST2024-07-23T16:15:47+5:302024-07-23T16:16:21+5:30
जखमी तरुण सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ते लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौकात कचरा वेचण्याचे काम करत सैतान ही घटना घडली

'मैं तुझे जिंदा छोडूंगा नहीं..! दारु पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या गळ्यावर कटरने वार
पुणे : मैं तुझे जिंदा छोडूंगा नहीं ,असे म्हणत दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून कचरा वेचक तरुणाच्या गळ्यावर कटरने वार केलेल्या एकाला फरासखाना पोलिसांनीअटक केली. लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौकात ही घटना घडली.
धमेंद्र नरेशचंद्र यादव (वय २६, सध्या रा. काँग्रेस भवनजवळील पदपथ, शिवाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुन पदम थापा (वय ३०, सध्या रा. डांबर गल्ली, बुधवार पेठ, मूळ रा. बीरता मठ, काठमांडू, नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत यादव यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यादव हा कचरा वेचक आहे. सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ते लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौकात कचरा वेचण्याचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी थापा तेथे आला. त्याने यादव याच्याकडे दारु पिण्यास पैसे मागितले. यादव याने त्याला पैसे देण्यास नकार दिला. आरोपी थापाने खिशातील कटर काढून त्याच्या गळ्यावर वार केले. या घटनेत यादव गंभीर जखमी झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत.