माझ्या सातबाऱ्यावर मीच करणार पीक पेराची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:47+5:302021-06-24T04:09:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने ई-पीक नोंदणी मोहिमेला शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ...

I will register the crop sowing on my Satbari | माझ्या सातबाऱ्यावर मीच करणार पीक पेराची नोंदणी

माझ्या सातबाऱ्यावर मीच करणार पीक पेराची नोंदणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य शासनाने ई-पीक नोंदणी मोहिमेला शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर लवकरच ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. याची जय्यत तयारी प्रशासनाने केली असून, ‘माझी शेती माझा साताबारा... मीच लिहिणार माझा पिक पेरा’ ही खास टॅगलाईन घेऊन ही मोहीम संपूर्ण राज्यातच राबविण्यात येणार आहे.

शासनाच्या ई- पीक नोंदणीमुळे राज्यातील कोणत्या भागात कोणते पीक घेतले आहे, याची अचूक माहिती आणि आकडेवारी मिळणे सहज शक्य होणार आहे. राज्यात येत्या १ जुलैपासून या मोहिमेचा आरंभ होणार आहे. पिकांची नोंद मोबाईल ॲॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

राज्यात महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आता गावपातळीवरच पीकपेरणीची माहिती संकलित करणे, पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे या हेतूने ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी टाटा ट्रस्टने मोबाईल ॲप विकसित केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प आठ जिल्ह्यातील २० तालुक्यांमध्ये राबविला होता. आता संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

------

प्रशासनाची तयारी पूर्ण

राज्य शासनाने ई पीक पाहणी या मोहिमेला तत्वत: मान्यता दिली आहे. आता लवकरच संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविण्यात येणार असून, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. महसूल विभाग आणि कृषी विभाग एकत्र येऊन ही मोहीम राबविणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प

------

Web Title: I will register the crop sowing on my Satbari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.