...तर राजकारणातून संन्यास घेईन : प्रेमसुख कटारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:28 AM2018-12-20T01:28:18+5:302018-12-20T01:28:39+5:30
कुरकुंभ मोरी प्रकरण : राजकीय स्वार्थासाठी विरोधकांकडून आरोप
दौंड : दौंड येथील नियोजित तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामकाजात अडथळा आणला असेल तर राजकारणाचा सन्यास घेईल. मात्र विरोधक केवळ राजकीय स्वार्थासाठी मी कुरकुंभ मोरीत अडथळा आणला म्हणून आरोप करीत असतात असे ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी सांगितले.
कुरकुंभ मोरीचा निधी पहिल्या टप्यात चार कोटी आला. नंतर तीन कोटी आणि शेवटी ८ कोटी ४४ लाख असा एकूण १५ कोट ४४ लाखांचा निधी नगर परिषदेने तातडीने रेल्वे खात्याकडे वर्ग केलेला आहे. आलेला निधी एक दिवस जरी रखडत ठेवण्याचे काम केले असेल आणि हे विरोधकांनी सिद्ध केल्यास राजकारणाचा सन्यास घेईल, असे कटारिया यांनी स्पष्ट केले.
नागरिक हित संरक्षण मंडळाची एकहाती सत्ता असताना नियोजित तिसºया रेल्वे कुरकुंभ मोरीचे प्रस्ताव घेऊन नगर परिषदेचे इंजिनिअर जिजाबा दिवेकर पहाटे जरी माझ्याकडे आले तरी पहाटे या प्रस्तावावर मी सह्या केल्या आहेत. तेव्हा मोरी अडविण्याचा प्रश्न येत नाही.
तत्कालीन आमदार रमेश थोरात यांनी वेळोवेळी रेल्वे खात्याच्या अधिकाºयांच्या बैठका घेतल्या होत्या. मात्र या बैठकांना नगराध्यक्ष या नात्याने मला कधीही बोलावले नाही. कुरकुंभ मोरीचे बजेट २१ कोटी होते. याला नगर परिषदेच्या सभागृहाने मान्यता दिली. नंतर २१ कोटीचे बजेट साडे सोळा कोटीवर कसे आले याचा उलगडा मात्र झालेला नाही.
कुरकुंभ मोरीचा निधी वळवला
कुरकुंभ मोरीचा निधी १ कोट ५३ लाख ५१ हजार २८७ रुपये तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी नगरपरिषदेच्या अन्य खात्यात वर्ग केला. त्याला आम्ही जबाबदार नाही. जी काही कारवाई होईल ती तत्कालीन मुख्याधिकाºयावर होईल, असे प्रेमसुख कटारिया यांनी स्पष्ट केले.
४रेल्वेला कोडल चार्जेस ६ कोटी २५ लाख रुपये भरायचे होते मात्र हे कोडल चार्जेस देखील ५ कोटी १ लाख झाले. या रकमा कमी कशा झाल्या. याबाबत मात्र साशंंकता आहे.
४कुरकुंभ मोरीचे इस्टिमेंट कमी होण्याच्या कारणाबाबत वेळोवेळी विचारणा केली मात्र तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी कधीच माहिती दिली नाही, असे शेवटी कटारिया म्हणाले.