"राज ठाकरे म्हणजे विचारांचा अथांग महासागर, मी राजमार्गावरच राहणार"; वसंत मोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 04:34 PM2022-05-10T16:34:44+5:302022-05-10T16:34:56+5:30

पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आंदोलनांत सहभागी नसल्याने विविध चर्चाना उधाण आले होते

i will stay with raj thackeray till the end said vasant more | "राज ठाकरे म्हणजे विचारांचा अथांग महासागर, मी राजमार्गावरच राहणार"; वसंत मोरे

"राज ठाकरे म्हणजे विचारांचा अथांग महासागर, मी राजमार्गावरच राहणार"; वसंत मोरे

googlenewsNext

पुणे : राज ठाकरेंनी पुकारलेल्या भोंग्यांच्या आंदोलनात कट्टर समर्थक आणि पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आंदोलनांत सहभागी नसल्याने विविध चर्चाना उधाण आले होते. त्यावेळी मी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बालाजी दर्शनाला गेलो होतो. अक्षय्य तृतीयेनिमित्ताने हे नियोजन केले होते. त्यामुळे मला आंदोलनात सहभागी होता आले नाही. परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते. एखादा सैनिक नसेल तर लढाई हरत नाहीत. त्यामुळे जर माझ्या नसल्याने विविध चर्चा होत असतील. तरी मी अजूनही राजमार्गावरच आहे आणि राजमार्गावरच राहणार मतभेद असले तरी मनभेद नाहीत तेव्हा वसंत मोरे यांनी स्पष्ट केले होते. 

आज सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांची भेट घेतली. यावेळी वसंत मोरे आणि मनसेचे शिष्टमंडळ वेगळे असल्याचे दिसून आले. याबाबत मोरे यांना विचारले असता त्यानी 'एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे. राज ठाकरे विचारांचा अथांग महासागर आहे, त्याला अनेक नद्या नाले मिळतात. सगळे खळखळणारे आहेत. त्यापैकी मी एक खळखळणारा आहे. त्यामुळं माझा मार्ग राजमार्ग असल्याचे त्यांनी सांगितले आहे.'
 
मोरे म्हणाले,  एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे. तसेच माझ्याकडे शहराची जबाबदारी नसली तरी माझ्याकडे तीन प्रभागांची जबाबदारी दिली. तर त्यातून मी ५ नगरसेवक निवडून आणू शकतो. वसंत मोरे यांना एकला चलो रे या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरे विचारांचा अथांग महासागर आहे, त्याला अनेक नद्या नाले मिळतात. सगळे खळखळणारे आहेत. त्यापैकी मी एक खळखळणारा आहे. माझी वाट नेहमी वेगळीच असते. माझं ध्येय धोरण असत, पक्ष वाढवणे, जास्तीत जास्त जाग निवडून आणणे हे आहे. शहराची जबाबदारी अध्यक्षांची आहे. त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही.  माझं २५ नगरसेवकांचे टार्गेट होते. माझ्या भागातील नगरसेवक कसे वाढतील याकडे लक्ष देतोय. माझा मार्ग राजमार्ग आहे.    

Web Title: i will stay with raj thackeray till the end said vasant more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.