‘मी तुला सांभाळतो, तुला घर घेऊन देतो, असे सांगून १३ वर्षीय मुलीवर केला वेळोवेळी बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 05:52 PM2021-03-17T17:52:00+5:302021-03-17T17:52:59+5:30

न्यायालायने आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा, मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून केले गर्भवती

"I will take care of you, I will take you home," he said | ‘मी तुला सांभाळतो, तुला घर घेऊन देतो, असे सांगून १३ वर्षीय मुलीवर केला वेळोवेळी बलात्कार

‘मी तुला सांभाळतो, तुला घर घेऊन देतो, असे सांगून १३ वर्षीय मुलीवर केला वेळोवेळी बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देजन्मठेप शिक्षेबरोबरच न्यायालयाने सुनावली २५ हजार रुपये दंडाची शिक्षेची रक्कम मुलीकडे देण्याचे आदेश

पुणे- आईचे निधन आणि वडील मनोरूग्ण असल्यामुळे घरातून निघून गेल्याने आजीच्या आधारावर जगत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून तिला गर्भवती केलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला जन्मठेप आणि 25 हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. ही दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्यात यावी असे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आरोपी हा पीडित मुलीशी विवाह करण्यासाठी तयार असताना देखील दोघांच्या वयातील अंतर, आरोपीने पीडित मुलीचा घेतलेला गैरफायदा लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा निकाल दिला आहे. आनंद पवार (वय ४५) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.

मार्च २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत ही घटना घडली. पीडित मुलगी तिच्या 80 वर्षांच्या आजीबरोबर राहात होती. आरोपी हा आजीच्या घरी दहा वर्षांपासून भाडेकरू म्हणून वास्तव्यास होता. त्याची पत्नी आणि मुले मूळ गावी असल्याने तो इथे एकटाच राहात होता. व्यवसायाने ड्रायव्हर असल्यामुळे तो रात्री अपरात्री घरी येऊन टेरेसवर झोपायचा. कामावरून आल्यावर अंथरून घेण्याच्या बहाण्याने घराचा दरवाजा वाजून तो पीडित मुलीला टेरेसवर घेऊन जायचा. त्यावेळी ‘मी तुला सांभाळतो, तुला घर घेऊन देतो, तुझ लग्न लावून देतो. असे सांगून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करत होता. घडलेल्या प्रकारा बाबत कोणाला सांगू नको, तू जर घरात सांगितले तर तुझे नातेवाईक आपल्याला मारून टाकतील अशी भीती तो पीडित मुलीला घालत होता. दरम्यान, त्रास होऊ लागल्याने पीडित मुलगी सरकारी दवाखान्यात गेली असता तपासणी केल्यावर ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी पीडितेने पवार याला ती गरोदर असल्याचे सांगताच त्याने याबाबत कोणाला सांगू नको तुझा गर्भपात करू असे सांगितले. मात्र, पोटामध्ये जास्त दुखू लागल्याने पीडित मुलीने पवार याला फोन केला असता, माझे नाव न घेता कोणाचेतरी नाव घेऊन आजीला घेऊन दवाखान्यात जा. त्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आजीला सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीला त्रास होऊ लागल्याने आजी आणि आत्याने पीडित मुलीला दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी पीडित मुलीने एका मुलाला जन्म दिला. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. खटल्यात त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल महत्वाचा ठरला. गुन्हा गंभीर असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अँड. हांडे यांनी युक्तीवादा दरम्यान केली.

 

Web Title: "I will take care of you, I will take you home," he said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.