'मी शाईच काय, छातीवर गोळ्याही झेलेन', शौर्यदिनी चंद्रकांत पाटलांचं बाबासाहेबांना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 02:43 PM2023-01-01T14:43:55+5:302023-01-01T14:45:02+5:30

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरुन अभिवादनाचे फोटो शेअर करत भूमिका मांडली आहे,  मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून, माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला.

I will take ink, even bullets on my chest for dr. babasaheb ambedkar, Chandrakant Patal's greetings to Babasaheb on Shaurya Dini | 'मी शाईच काय, छातीवर गोळ्याही झेलेन', शौर्यदिनी चंद्रकांत पाटलांचं बाबासाहेबांना अभिवादन

'मी शाईच काय, छातीवर गोळ्याही झेलेन', शौर्यदिनी चंद्रकांत पाटलांचं बाबासाहेबांना अभिवादन

googlenewsNext

पुणे - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी रोजी हजारो नागरिक येतात. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुण्यासह राज्यातील ७० जणांना या कार्यक्रमाला येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चौघांना नोटीस पाठविण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येथे अभिवादन करण्यास आले आहेत. मात्र, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. याठिकाणी त्यांच्या उपस्थितीला होणारा विरोध लक्षात घेऊन त्यांनी विजयस्तंभाला जाणे टाळले.   

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरुन अभिवादनाचे फोटो शेअर करत भूमिका मांडली आहे,  मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून, माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती. आताही मी भीमा कोरेगाव ला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे, परंतु हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. मोठ्या प्रमाणात माझ्या माता, भगिनी, वयस्कर मंडळी, लेकरं तिथे श्रध्देने आले असतील, येत असतील तर त्यांची श्रद्धा व सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, असे पाटील यांनी  म्हटले. 

आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत. त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून विजयस्तंभास मानवंदना देणार आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मनसुबा मी पुर्ण होऊ देणार नाही आहे. सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
 

Web Title: I will take ink, even bullets on my chest for dr. babasaheb ambedkar, Chandrakant Patal's greetings to Babasaheb on Shaurya Dini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.