पोलिसांनी सांगितले तर बोलेन : डी. एस. कुलकर्णी; पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:53 PM2018-02-07T13:53:17+5:302018-02-07T13:55:17+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी निलेश मोरे यांच्या कार्यालयात हजर झाले.
पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी नीलेश मोरे यांच्या कार्यालयात हजर झाले. दुपारी १ वाजेपर्यत त्यांची पोलीस उपायक्त सुधीर हिरेमठ व मोरे यांनी चौकशी केली.
बाहेर पडताना डी. एस. कुलकर्णी म्हणाले, की चौकशी सुरू झाली आहे, पोलिसांनी काहीही सांगण्यास मनाई केली आहे. त्यांनी परवानगी दिली तर, मीडियाशी बोलेन.
नीलेश मोरे म्हणाले, की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपासाचा भाग म्हणून चौकशी सुरू झाली आहे, काय चौकशी केली, हा तपासाचा भाग असल्याने आता सांगता येणार नाही.
दरम्यान, डीएसकेंच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रकिया महसूल विभागाकडून केली जात आहे.