"आजच्या काळात संतांचे विचारच मार्गदर्शक, तरुण पिढी त्याकडे कसं पाहते हे महत्त्वाचं!"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:33 AM2022-12-26T10:33:26+5:302022-12-26T10:35:10+5:30

रिंगण वक्तृत्व स्पर्धेप्रसंगी आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचं वक्तव्य

ias kaustubh diwegaonkar said in today times thoughts of sant are guide how the young generation looks at it is important | "आजच्या काळात संतांचे विचारच मार्गदर्शक, तरुण पिढी त्याकडे कसं पाहते हे महत्त्वाचं!"

"आजच्या काळात संतांचे विचारच मार्गदर्शक, तरुण पिढी त्याकडे कसं पाहते हे महत्त्वाचं!"

Next

आळंदीसध्याचं युग हे क्रोधाचं, द्वेषाचं आणि विचारधारांच्या अंताचं आहे. अशा काळात संतांचे विचार खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत. देशाचं भविष्य असणारी तरुण पिढी संत विचारांकडे कसं पाहते, याचा अभ्यास व्हायला हवा, असं मत आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केलं. संत विचारांवर आधारित रिंगण वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. 

पौर्णिमा तोटेवाड (औरंगाबाद), मुग्धा थोरात (पुणे), श्रुती बोरस्ते (नाशिक), सुजित काळंगे (सातारा), गणेश खुटवड (पुणे) यांना अनुक्रमे पहिल्या पाच पुरस्कारानी गौरवण्यात आलं. तर यश पाटील, आकाश सोनवणे आणि शुभांगी ढेमसे यांना उत्तेजनार्थ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ११ हजार, ९ हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार आणि उत्तेजनार्थ २ हजार अशी रोख रकमेची पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.

प्रख्यात पखवाजवादक दासोपंत स्वामी यांच्या वादनाने स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी एमआयटी युनिवर्सिटीचे संचालक महेश थोरवे आणि प्रा. पांडुरंग कंद उपस्थित होते. तर पुरस्कार वितरण सोहळ्यात कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह हभप पुरुषोत्तम पाटील आणि वार्षिक रिंगणचे संपादक सचिन परब होते. परीक्षक म्हणून अमृता मोरे आणि प्रा. डॉ. राजेंद्र थोरात उपस्थित होते.

रिंगण वक्तृत्व स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्यानं ही स्पर्धा घेण्यात आली. यंदा महाराष्ट्रभरातून १५ ते २० वयोगटातील ५४ स्पर्धक सहभागी झाले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ias kaustubh diwegaonkar said in today times thoughts of sant are guide how the young generation looks at it is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.