आयएएसची पाऊलवाट-भारतीय प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:10 AM2021-04-22T04:10:30+5:302021-04-22T04:10:30+5:30
इन्ट्रो यूपीएससीत क्वचितच विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतात. त्याला कारणे अनेक आहेत, त्यामुळे बरेच विद्यार्थी क्षमता असूनही अपुरे मार्गदर्शन ...
इन्ट्रो
यूपीएससीत क्वचितच विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतात. त्याला कारणे अनेक आहेत, त्यामुळे बरेच विद्यार्थी क्षमता असूनही अपुरे मार्गदर्शन किंवा आर्थिक परिस्थितीमुळे यशस्वी होत नाही. अशा अनेक मुलांसाठी ‘आयएएसची पाऊलवाट-भारतीय प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास’ हे पुस्तक यशाची गुरुकिल्ली ठरेल. संकेत भोंडवे हे मध्य प्रदेश केडरचे २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव म्हणून ते काम पाहत आहेत.
भारताच्या विकासातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल केलेले अधिकार, संधी व आव्हान सर्वश्रुत आहेत. त्यामुळे अनेक तरुण यूपीएससीच्या माध्यमातून स्पर्धापरीक्षांची तयारी मनापासून करतात. काही तरी वेगळं करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करताना प्रशासकीय अधिकारी सेवेला निर्माण झालेले वलय सर्वांचे लक्ष वेधून घेते. निर्माण झालेली स्पर्धा, आवश्यक असणाऱ्या तयारीची जाण, एकंदर यशस्वी होण्यासाठी लागणारे सामान्य ज्ञान या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या परीक्षेचे व्यापक स्वरूप लक्षात घेता यश मिळविणे आव्हानात्मक वाटते. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जरी लाखांत असली, तरी यशस्वी होणारे विद्यार्थी फक्त हजार बाराशेच असतात.
संकेत भोंडवे यांचे वडील पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मुख्य उद्यान अधीक्षक म्हणू कार्यरत होते. वडिलांच्या कामाचा प्रभाव व उद्यान निर्मितीमधील नावीन्यपूर्ण उपक्रम यामुळे एका सामान्य कुटुंबात राहणारे, घरी प्रशासकीय सेवेची कोणतीही परंपरा नसताना भोंडवे एक ध्येय समोर ठेवून या परीक्षेचा अभ्यास करत होते. सुरुवातीच्या काळात अनेक परीक्षांत अपयशी झाले. मात्र, अभ्यासातील सातत्य, चिकाटी, अपार कष्टाच्या जोरावर ते चौथ्या प्रयत्नांत आयएएस झाले. आयएएसच्या वाटेवरील आव्हान सोपे नाही. परंतु, या पुस्तकामुळे तुमचे स्पर्धा परीक्षेतील पाऊल नक्कीच यशाच्या वाटेवरील सुखकारक अनुभव देणारे असेल.
प्रशासकीय सेवेचा १३ वर्षांचा मार्गदर्शन स्वानुभव
भाेंडवे म्हणाले की, आयएएस झाल्यावर सत्कार समारंभात न रमता, ग्रामीण विद्यार्थ्यांना कॉलेजेस, महाविद्यालयांत मार्गदर्शन केले. नंतर असे लक्षात आले की, याप्रकारे गावागावांत पोहोचू नाही शकत, म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवून २००७ मध्ये ‘आयएएसची पाऊलवाट’ हे पुस्तक लिहिले. पुढे स्पर्धापरीक्षेतील होणारे बदल आणि काळाची गरज ओळखून गेल्या १३ वर्षांत या पुस्तकाच्या सहा आवृत्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करता आल्या. आताची सातवी आवृत्ती फारच वेगळी आहे. अगदी सोप्या भाषेत स्पर्धा परीक्षेचे विवेचन आणि प्रशासकीय सेवेचा १३ वर्षांचा स्वानुभव दिला आहे. हे आत्मकथनपर पुस्तक मुलांना निव्वळ मार्गदर्शन करणारे नव्हे, तर या परीक्षेत यश कसे मिळवायचे आणि या सेवेत स्थिर कसे व्हायचे, याचा साक्षात्कार सोप्या भाषेत मांडणारा मूलमंत्र आहे.
पाचसूत्री आयएएसचा मूलमंत्र
भोंडवे यांनी सहा राष्ट्रीय आणि दहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून संपूर्ण भारतात मानाचे स्थान मिळविले आहे. आपल्याच घरातील मोठ्या भावाने एखाद्या परीक्षेची तयारी करून घ्यावी, अशी भावना हे पुस्तक वाचताना अनेकांच्या मनात नक्की निर्माण होईल. भोंडवे यांच्या यशाचे, जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास आणि आईवडील, गुरुजनांचे आशीर्वाद हे पाचसूत्री मूलमंत्र ‘आयएएसचा गुरुमंत्र’ म्हणून सर्वांना नक्कीच उपयोगी होईल ही आशा. ज्येष्ठ स्पर्धापरीक्षा मार्गदर्शक संतोष हिंगे आणि डॉ. श्रीनाथ कवडे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे.
‘निबंध’ तुमच्या विचारांचे प्रतिबिंब कसे निर्माण करतो
स्पर्धापरीक्षेचे पहिले आव्हान हे पूर्व परीक्षा आहे. या आव्हानाला सामोरे जाताना अगदी सुरुवातीपासून कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे आणि त्यानंतर कोणत्या गोष्टी मुख्य परीक्षेत उपयोगी पडू शकतात. निबंध लेखन हा तब्बल २५० गुणांचा स्वतंत्र पेपर असतो. या पुस्तकातून निबंध हा तुमच्या विचारांचे प्रतिबिंब कसे निर्माण करू शकतो आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा बनून तुमचा स्कोर वाढविता येणे सहज शक्य आहे. वर्तमानपत्रांचे वाचन, उत्तर लेखत्च्या सरावाबरोबरच ‘आव्हान यूपीएससीचे’ या धड्यात मुलाखतीवर भर देऊन लेखकाने स्वतःचे अनुभव आहे त्या शब्दांत आणि अनुभवातून व्यक्त केले आहे. इंग्रजी विषयाबद्दलची भीती ‘इंग्लिश...अरे बापरे!’ हा धडा वाचून बऱ्याच विद्यार्थ्यांची भीती नक्की कमी होईल यात शंकाच नाही.
(फोटो - संकेत भोंडव-आयएएस या नावाने आहे.)