पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयातील आयसीयू कक्ष होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 12:16 PM2020-07-17T12:16:26+5:302020-07-17T12:24:57+5:30

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून जुलै अखेरीस शहरात आयसीयू, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड कमी पडण्याची शक्यता

ICU room of Dalvi Hospital of Pune Municipal Corporation will be started | पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयातील आयसीयू कक्ष होणार सुरू

पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयातील आयसीयू कक्ष होणार सुरू

Next
ठळक मुद्देनव्याने भरती केलेल्या मनुष्यबळाची नेमणूक : ससूनकडूनही मिळणार मनुष्यबळ क्रेडाईकडून देण्यात आलेले दहा व्हेंटिलेटर्स दोन महिन्यानंतर उपयोगात येणार

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या दळवी रुग्णालयात दोन ते तीन दिवसात अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. पालिकेने नव्याने भरती केलेल्या तज्ञ मनुष्यबळासह ससूनकडून मिळणारे मनुष्यबळ येथे नेमण्यात येणार आहे. त्यामुळे क्रेडाईकडून देण्यात आलेले दहा व्हेंटिलेटर्स दोन महिन्यानंतर उपयोगात येणार आहेत. यासंदर्भात आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दळवी रुग्णालयात डॉक्टरांची बैठक घेतली.
अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असून तज्ञ मनुष्यबळासाठी पालिकेने ससून रुग्णालयाला पत्र दिले आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून जुलै अखेरीस शहरात आयसीयू, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड कमी पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पालिकेच्या दळवी रुग्णालयात लवकरच आयसीयू कक्ष सुरू केला जाणार आहे.

क्रेडाई पुणे मेट्रो या संस्थेने महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग कार्यान्वीत करण्यासाठी १ कोटीचा निधी सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिला होता. या अतिदक्षता विभागात १० बेड, व्हेंटिलेटर, डिफिलेटर, सक्शन मशीन, इसीजी मशीन इत्यादी अशा ४० अद्ययावत उपकरणांचा समावेश असून सध्याच्या काळात कोविड १९ शी लढणाऱ्या रुग्णांना यामुळे अद्ययावत सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत.
या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर प्रसूतिगृह आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर विलगिकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. पालिकेला आवश्यकता असलेल्या चेस्ट फिजिशियन, फिजिशियन, भुलतज्ञ, इंटेसिव्हीस्ट, आयसीयू परिचारिकांची आवश्यकता आहे. पालिकेने नुकतीच डॉक्टर्स आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची भरती केली आहे. यातील काही जणांना दळवी रुग्णालयात नेमण्यात आले आहे. नेमण्यात आलेल्यांमध्ये चेस्ट फिजिशियन, फिजिशियन, भुलतज्ञ, इंटेसिव्हीस्ट, आयसीयू परिचारिका यांचा समावेश आहे.
---------
या सुविधा मिळणार
अतिदक्षता विभाग (आयसीयू) बेड - १०
स्टेप अप बेड्स (आयसीयूमधून बाहेर काढल्यावर) - ०६
ऑक्सिजन बेड्स - २०
आयसोलेश बेड्स - ४८
---------
अशी झाली मनुष्यबळाची नेमणूक
बीएएमएस डॉक्टर - ०६
नर्स - २०
वैद्यकीय कर्मचारी - २०
सुरक्षा रक्षक - १०
   ---------

Web Title: ICU room of Dalvi Hospital of Pune Municipal Corporation will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.