पुण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘आयडिया’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:07 PM2019-07-17T13:07:41+5:302019-07-17T13:09:27+5:30

वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना सुचविण्याबाबत ‘लोकमत’ने पुढाकार घेत वाहतूक तज्ज्ञांचा संवाद घडवून आणला.

'Idea ' to break traffic jam problem in pune | पुण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘आयडिया’

पुण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘आयडिया’

googlenewsNext
ठळक मुद्देआयुक्तांकडून स्वागत : आयडियाज फॉर अ‍ॅक्शन अ‍ॅक्शन नाऊ 

पुणे : वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला. त्यासाठी तज्ज्ञांची चर्चा घडवली. त्यातील अनेक मुद्दे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनाही भावले आहेत. यासंदर्भात रविवारी (दि. १४) ‘वाहतुकीचे तीन-तेरा थांबतील; हवी इच्छाशक्ती’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेले वृत्त त्यांनी ट्विटरवर टाकले आहे. त्यावर त्यांनी ‘आयडियाज फॉर अ‍ॅक्श्न, अ‍ॅक्शन नाऊ’ असे लिहित नागरिकांनाही कल्पना सुचविण्याचे आणि त्यावर कृती करण्याचे आवाहन केले आहे.  
पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही नागरिकांनीही विविध पर्याय सुचविले.  वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना सुचविण्याबाबत ‘लोकमत’ने पुढाकार घेत वाहतूक तज्ज्ञांचा संवाद घडवून आणला. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांचाही चर्चेत सहभाग होता. यात विविध उपाययोजना सुचवल्या. 
.....
* जपानमधील सिग्लन यंत्रणेचा अभ्यास करायला हवा. दुचाकीसाठी स्वतंत्र लेन करता येईल. तसेच सिग्नलजवळ दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र थांबा लाईन असावी. अनेकदा दुचाकी वाहने झेब्रा क्रॉसिंगवरच उभी असतात. 

*बीआरटी बंद करा. ही पूर्णपणे निरुपयोगी आहे. ‘लेन सिस्टीम’ करून ती वाहनचालकांनी पाळण्याचे बंधनकारक करावे.
* वाहतूककोंडीवर ‘वॉकिंग प्लाझा’ हाही उत्तम पर्याय आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रामुख्याने लक्ष्मी रस्ता व दगडूशेठ गणपती मंदिराजवळ याचा विचार करायला हवा. दिल्लीमध्ये काही रस्त्यांवर तीन महिन्यांसाठी हा प्रयोग करण्यात आला आहे.
...........
अनिरुद्ध सहस्रबुद्धे : लक्ष्मी रस्त्यावर चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यास बंदी आहे. या रस्त्यावर अनेक सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. पण अनेकदा नो पार्किंग फलकाच्या समोरच वाहने उभी केली जातात. या ठिकाणी संबंधित वाहनचालकांनी महापालिकेच्या पार्किंगमध्येच वाहने उभी करण्याबाबत सूचना देणारी यंत्रणा उभी करायला हवी. 
......
सचिन गुजर : वाहतूक समस्येवर स्वयंशिस्त हे उत्तर आहे. मंडईजवळील पार्किंग व्यवस्था खूपच अडचणीची आहे. 
याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
किरण : मेट्रोची कामे आणि तोकडे रस्ते अशा परिस्थितीत बीआरटी लेन ५० टक्के जागा व्यापत आहे. जिथे जिथे बीआरटी आहे तिथे ही लेन सर्वांसाठी खुली करून दिली तर वाहतूककोंडीची समस्या कमी होईल.
......
के. प्रशांत : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करणे योग्य आहे. त्यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. त्यामुळे कमीत कमी कर्मचारी लागतात आणि पुरावेही मिळतात. मोठ्या रस्त्यांवर ‘रिअल टाईम ट्रॅफिक डाटा’चा वापर करून वाहतूककोंडीची वेळ, जागा आणि कारणे शोधता येतील. 
.....
अमित पवार : विशालनगर ते हिंजवडीदरम्यान बस 
लेन, कार लेन 
आणि बाईक लेन 
अशी लेन सिस्टीम करायला हवी. सिग्नल येण्यापूर्वी या लेन बदलण्यास परवानगी द्यावी.
नीलेश कोरडे : पादचाºयांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. बंगळुुरूमध्ये ही यंत्रणा असून त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदाही होत 
आहे. तिथे अलार्म बसविण्यात 
आले आहेत. वाहनचालकांकडूनही त्याचे पालन केले 
जात आहे. 
......
साकेत चौधरी : सिग्नलच्यालगत थांबणाºया चारचाकी वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. पीएमपी व एसटीच्या चालकांचा अनुभवही वाईट आहे. काही चालक रस्त्याच्या मधेच बस थांबवितात. यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळेही कोंडी कमी होईल. 

Web Title: 'Idea ' to break traffic jam problem in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.