पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श, भक्तीमय वातावरणात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:04+5:302021-09-22T04:11:04+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी शहर पोलिसांचे वतीने पुणे पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीमध्ये कोरोना विषाणू ...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी शहर पोलिसांचे वतीने पुणे पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर राज्यशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गणेशोत्सव साजरा झाला. असे असले तरीही पूर्व हवेलीत ना ढोल ताशांचा दणदणाट… ना गुलालांची उधळण… ना भव्यदिव्य मिरवणुका… मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया… मोरया रे बाप्पा मोरया रे… अशा घोषणा देत विघ्नहर्ता गणरायाचं आगमन व विसर्जन झाले. रस्त्यावर नेहमीसारखी गर्दी नसली तरी उत्साह मात्र कायम होता. यावेळी गणेश भक्तांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले.
यावेळी गणेश मूर्तीचे विसर्जन सार्वजनिक घाट, नदी, ओढा याठिकाणी करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली होती. त्यामुळे २० गावांतील सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी ग्रामपंचायतीचे वतीने कृत्रिम हौद तयार करण्यात आले होते. तेथील मंडपात धार्मिक विधी करून. सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जन करण्यात आले.
फोटो - मंडपात धार्मिक विधी करून कृत्रिम हौदात सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जन करण्यात आले.