शिंदे दाम्पत्याला आदर्श गोपालक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:27+5:302021-07-29T04:10:27+5:30
वरकुटे बु., ता. इंदापूर याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विजय शिंदे, माजी सरपंच शामराव ...
वरकुटे बु., ता. इंदापूर याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विजय शिंदे, माजी सरपंच शामराव देवकर, रामभाऊ चितळकर, विस्तार अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे, गोविंद देशमुख, रमेश शिंदे, प्रवीण देवकर, विजयकुमार करे, रणजित करे, बालाजी भोसले, अशोक पवार, किरण देवकर, सागर बालगुडे, नाना देवकर, गणेश राऊत, महेश शिंदे, दादा देवकर, राजेंद्र देवकर, अभिमान चितळकर, डॉ. बांगर, डॉ. हेंद्रे, डॉ. शिंदे, डॉ. राऊत, डॉ. काझडे, डॉ. गुघे, विनायक कुंभार, गणेश जाधव, दत्तात्रय देवकर उपस्थित होते.
प्रवीण माने म्हणाले की, काही पुरस्काराचे वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्यात आले होते. कोरोनासदृश्य परिस्थितीमुळे मोजक्याच पुरस्कार्थींना आदर्श गोपालक पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. त्यामुळे शिंदे यांना हा पुरस्कार देऊन गौरविले. दीपक शिंदे हे आदर्श गोपालक असून त्यांनी उत्तम पद्धतीने त्यांनी आपल्या गुरांची निगा राखली आहे. मागील ३ वर्षांपूर्वी शिंदे यांची १५ गुरे लाळ खुरकत रोगाने दगावली होती. तरीही जिद्द न सोडता, पुन्हा उभारी घेत ३० जनावरांचा गोठा निर्माण केला.
दीपक शिंदे व त्यांच्या पत्नी सुषमा शिंदे यांना प्रवीण माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
२८०७२०२१-बारामती-०४