बुद्धांनी दिलेले पंचशील अंगीकारल्यास आदर्श जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:59+5:302021-09-26T04:10:59+5:30
खोडद: तथागत बुद्धांनी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त व मध्यम मार्ग म्हणून पंचशील व अष्टांगिक मार्ग दिला ...
खोडद: तथागत बुद्धांनी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त व मध्यम मार्ग म्हणून पंचशील व अष्टांगिक मार्ग दिला आहे. आपले मन हे दुःखाचे उगमस्थान आहे. आपण जर मनावर नियंत्रण मिळवले तर आपण नक्कीच दुखःमुक्त होऊ. मैत्री, दान, समाधान, नम्रता आणि प्रज्ञा हे पंचशीलाचे महत्त्वाचे गुण आहेत. बुद्धांनी दिलेले पंचशील प्रामाणिकपणे अंगीकारल्यास एक आदर्श जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन धम्मचारी अदित्य बोधी यांनी केले.
वर्षावासानिमित्त जुन्नर तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी भाजे येथील बुद्धलेणी व सधम्म प्रदीप ध्यान-धारणा केंद्राला भेट देण्यासाठी धम्मसहल आयोजित केली होती. ध्यान-धारणा केंद्रात त्रिशरण, पंचशील, ध्यान व बुद्धवंदना झाल्यानंतर धम्मप्रवचन करताना अदित्य बोधी बोलत होते.
यावेळी धम्मचारी अदित्यबोधी म्हणाले की, ध्यान-धारणेमुळे आपले मन एकाग्र होते व मन एकाग्र झाल्याने आपण आपल्या कामावर उत्तमप्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी बुद्धांनी दिलेला ध्यान-धारणेचा मार्ग सर्वोत्तम आहे. आपले मन व विचार हे मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहेत. आपले मन व विचार नियंत्रणात ठेवण्यासाठी ध्यान-धारणा महत्वाची आहे.
धम्मचारी यशोरत्न म्हणाले की, "अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, शडायतन, स्पर्श, वेदना,तृष्णा, उपदान (आसक्ती ),भव, जन्म, जरा (मृत्यू) हे मानवी जीवनातील शाश्वत सत्य आहेत तर दुःख,श्रद्धा,आनंद,प्रीती,प्रमोद,सुख,समाधी,या अवस्था आहेत.दुःख, दुःखातून श्रद्धा,श्रद्धेतून आनंद,आनंदातून प्रमोद,प्रमोदातून सुख,सुखातून समाधी अशाप्रकारे एकातून एक भावना निर्माण होतात. म्हणून आजच्या काळात बुद्धांनी दिलेला मध्यम मार्ग जीवन जगण्यासाठी सोपा व सहज आहे."
प्रास्ताविक धम्मचारी यशोरत्न यांनी केले व धम्मचारी प्रबोधरत्न यांनी स्वागत व आभार व्यक्त केले.धम्म प्रवचनानंतर भाजे येथील बुद्ध लेणीला सर्वांनी भेट देऊन या लेणीविषयी माहिती जाणून घेतली.
२५ खोडद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने वर्षावासानिमित्त भाजे येथील सधम्म प्रदीप ध्यानधारणा केंद्राला भेट दिली.
250921\picsart_09-25-02.17.47.jpg
?????? - ??.????????? ??????? ??????????????????? ????? ??????????? ???? ????? ????? ?????? ?????????? ????????? ??? ????.