सौरऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती करत चतु: श्रृंगी पोलीस ठाण्याचे एक आदर्श पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 03:07 PM2019-02-03T15:07:39+5:302019-02-03T15:14:20+5:30

ऊर्जा प्रकल्पातून दहा किलो वॅट सौरऊर्जा निर्माण होणार असून चतु:श्रुंगी पोलिस स्टेशनमधील सर्व विद्युत व्यवस्था या अंतर्गत कार्यान्वित होईल .

An ideal step for Chatu Shringi police station to generate solar-based electricity | सौरऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती करत चतु: श्रृंगी पोलीस ठाण्याचे एक आदर्श पाऊल 

सौरऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती करत चतु: श्रृंगी पोलीस ठाण्याचे एक आदर्श पाऊल 

googlenewsNext
ठळक मुद्देसौरऊर्जा विद्युत प्रकल्पामुळे पोलीस स्टेशनला चोवीस तास विद्युत पुरवठाआधुनिक यंत्रणा सक्षमपणे  विद्युत व्यवस्थेमुळे वापरता येणे शक्य होणार

पाषाण:  चतु:श्रुंगी पोलीस स्टेशन येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे विद्युत निर्मिती करत व स्वत:च्या विजेवर चालणारे पोलीस स्टेशन झाले आहे. 
चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्यातील पहिल्यांदाच चतुश्रृंगी पोलिस स्टेशनच्या इमारतीवर अकरा लाख रुपये किंमतीचा ऊर्जा प्रकल्प साकारण्यात आला आहे .या ऊर्जा प्रकल्पातून दहा किलो वॅट सौरऊर्जा निर्माण होणार असून चतु:श्रुंगी पोलिस स्टेशनमधील सर्व विद्युत व्यवस्था या अंतर्गत कार्यान्वित होईल .


सदर प्रकल्पाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश व डायरेक्टर जनरल महाऊर्जा व यशदाचे महासंचालक आनंद लिमये यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त परिमंडळ ४ प्रसाद अक्कानवरू, पोलीस उपायुक्त गायकवाड खडकी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे , पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली गलांडे, महाऊर्जा व्यवस्थापक रोडे, रोहनकर तसेच चतु:श्रुंगी पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
विद्युत निर्मितीसाठी पोलिस स्टेशनच्या छताचा वापर करण्यात आला असून या प्रकल्पामुळे पोलिस स्टेशनमधील कामाला गती मिळणार आहे .तसेच आधुनिक यंत्रणा सक्षमपणे  विद्युत व्यवस्थेमुळे वापरता येणे शक्य होणार आहे .
पोलीस उपायुक्त के. व्यंकटेश म्हणाले, चतुश्रृंगी पोलिस स्टेशन प्रमाणे जर राज्यातील अन्य पोलीस स्टेशनवर देखील असे प्रकल्प उभारल्यास पोलीस स्टेशन सातत्यपूर्ण ऑनलाइन राहू शकते व विजेची अडचण येणार नाही.
पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे म्हणाले,  सौरऊर्जा विद्युत प्रकल्पामुळे पोलीस स्टेशनला चोवीस तास विद्युत पुरवठा होईल तसेच पोलिस स्टेशनला वीज गेल्यानंतर येणाऱ्या अडचणींचा सामना देखील करावा लागणार नाही .यामुळे ऑनलाइन तक्रारी सीसीटीव्ही वरील वॉच यासाठी आणखी मदत होणार आहे .

Web Title: An ideal step for Chatu Shringi police station to generate solar-based electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.