पुणे जिल्ह्यातील सात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 08:48 PM2018-08-28T20:48:54+5:302018-08-28T20:50:26+5:30
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये जिल्ह्यातील सात शिक्षकांचा समावेश आहे.
पुणे : राज्य शासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये जिल्ह्यातील सात शिक्षकांचा समावेश आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तीन शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शासनाकडून दरवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. मंगळवारी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकुण १०८ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक, १८ आदिवासी प्राथमिक शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, २ विशेष शिक्षक (कला/क्रीडा), १अपंग शिक्षक, १ गाईड शिक्षक व १ स्काऊट शिक्षकांचा समावेश आह. या पुरस्कारांचे वितरण दि. ५ सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. एकुण १०८ पुरस्काराप्राप्त शिक्षकांमध्ये पुणे जिल्ह्यात सात शिक्षकांचा समावेश आहे. त्यापैकी तीन शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहेत. प्राथमिक शिक्षक पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील दोन्ही शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहेत. तसेच आदिवासी प्राथमिक शिक्षक पुरस्कारही जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनाच मिळाला आहे. कला शिक्षकांसाठीचा एकमेव पुरस्कार पुण्यातील अहिल्यादेवी हायस्कुलमधील सहायक शिक्षक मोहन देशमुख यांना जाहीर झाला आहे. प्राथमिक शिक्षक प्पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे -
प्राथमिक शिक्षक -
१. माधुरी वेल्हाळ (सहायक शिक्षक) - जिल्हा परिषद शाळा, रायवाडी
२. बळीराम सरपणे (सहायक शिक्षक) - जिल्हा परिषद शाळा, खेडेकरवस्ती (खामगाव), ता. दौंड
माध्यमिक शाळा -
१. अण्णासाहेब पाटील (सहायक शिक्षक) - श्री शिवाजी मराठा जिजामाता हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, शुक्रवार पेठ
२. एकनाथ बुरसे (मुख्याध्यापक ) - हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कुल, खराळवाडी, पिंपरी
आदिवासी प्राथमिक शाळा -
१. उत्तम सदाकाळ (सहायक शिक्षक) - जिल्हा परिषद शाळा, करंजाळे, ता. जुन्नर
कला शिक्षक -
१. मोहन देशमुख (सहायक शिक्षक) - अहिल्यादेवी हायस्कुल फॉर गर्ल्स, पुणे
सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार -
१. डॉ. तेजस्विनी जगताप (सहायक शिक्षक) - साधना विद्यालय व आर. आर. शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, हडपसर.
-----------------------------