जिल्हा परिषद शिक्षकांचा उपक्रम आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:12+5:302021-06-23T04:08:12+5:30
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रय वाळुंज, नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे या चार शिक्षकांनी ...
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रय वाळुंज, नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे या चार शिक्षकांनी हा उपक्रम गेली चार वर्षांपासून सुरू केला आहे. यावर्षी ७५ मुलांना दत्तक घेण्यात आले असून या मुलांचा इयत्ता १० वीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च हे शिक्षक करणार आहेत.
यावर्षी या मुलांबरोबरच कोविडने पालक गमावलेल्या ११ मुलांनाही दत्तक घेण्यात आले असून त्यांनाही शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे.
या मुलांना स्कूलबॅग, वॉटरबॅग, टिफीन, वह्या, पेनबॉक्स, पेन्सिलबॉक्स, स्केचपेन, पॅड, कंपासपेटी, पेन हे शैक्षणिक साहित्य तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यकिट देण्यात येणार आहे.
या उपक्रमाची दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी या शिक्षकांना बोलावून या उपक्रमाची माहिती घेतली.
या विधायक उपक्रमाबद्दल या शिक्षकांचा यथोचित सत्कार केला.
या वेळी ॲड. सुखदेवतात्या पानसरे, खेड तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष धर्मराज पवळे, युवा ग्रामपंचायत सदस्या शिवराज्ञी पवळे, शिक्षक किसन कोंढवळे, नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके उपस्थित होते.
फोटो ई मेल करत आहे.
--
फोटो क्रमांक : जिल्हा परिषदे
फोटो ओळी : आंबेगाव तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे.