महत्त्वाची बातमी! विमानतळावर प्रवाशांचा चेहराच ठरणार ओळखपत्र अन् बोर्डिंग पास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 01:18 PM2022-01-03T13:18:54+5:302022-01-03T13:22:30+5:30

ही सुविधा पूर्णपणे ऐच्छिक आहे. मात्र ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे...

identity card boarding pass face of passengers airport biometric boarding system | महत्त्वाची बातमी! विमानतळावर प्रवाशांचा चेहराच ठरणार ओळखपत्र अन् बोर्डिंग पास

महत्त्वाची बातमी! विमानतळावर प्रवाशांचा चेहराच ठरणार ओळखपत्र अन् बोर्डिंग पास

googlenewsNext

प्रसाद कानडे

पुणे: विमानतळावर आता प्रवाशांचा चेहराच बोर्डिंग पास आणि ओळखपत्र म्हणून गणले जाणार आहे. कारण पुण्यासह देशांतील सहा निवडक विमानतळांवर फेशियल रेकग्नाईझ प्रणालीच्या आधारे बीबीएस (biometric boarding system/biometrics face recognition) विकसित केली आहे. ही यंत्रणा सध्या प्रायोगिक तत्त्वावर काम करीत आहे. डीजी यात्रा अंतर्गत प्रवासी यांचा लाभ घेऊ शकतील. पुणे विमानतळांवर सध्या याची चाचणी सुरू आहे. यामुळे प्रवाशांचा कागदपत्रे तपासणे व बोर्डिंग पाससाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार आहे.

विमानतळावरील कामकाज हे कॉन्टॅक्ट लेस, पेपरलेस व कमी गुंतागुंतीची व्हावी या उद्देशाने डिजिटल यात्रा विकसित करण्यात आली. त्याच्या पहिल्या टप्प्यात देशांतील सहा निवडक विमानतळावर बीबीएस (बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टिम ) तयार केली. यात पुणे, बेंगळुरू, हैद्राबाद, विजयवाडा, कोलकाता व वाराणसी ह्या शहरातील विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. ह्या सहा विमानतळावर सध्या ट्रायल्स सुरू आहेत. मार्च २०२२ पर्यंत ते पूर्ण क्षमतेने विकसित करून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाचे राज्य मंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी राज्यसभेत सांगितले.

हे कसे काम करेल :

ही सुविधा पूर्णपणे ऐच्छिक आहे. मात्र ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी सर्वप्रथम आपल्या मोबाइलमध्ये डीजी यात्राचे ॲप डाऊनलोड करणे, यानंतर आपले नाव, मेल आयडी, ओळखपत्र, याची माहिती समाविष्ट केल्यानंतर आपल्याला डीजीचा आयडी तयार होईल. हा आयडी तयार झाल्यावर डीजी यात्रावर आपले प्रोफाइल तयार होईल. ही माहिती विमानतळाच्या डेटा स्टोरमध्ये जमा होईल. जेव्हा प्रवासी विमानतळांवर दाखल होईल, तेव्हा त्यांना मोबाइलमधील ह्या प्रोफाइलचे कोड स्कॅन केले की, लगेच उपलब्ध माहितीची खातरजमा केली जाईल. त्यामुळे प्रवाशांना कागदपत्रे दाखवावे लागणार नाहीत.

Web Title: identity card boarding pass face of passengers airport biometric boarding system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.