chandrakant patil | चंद्रकांत पाटलांवर शाई फेक करणाऱ्याची ओळख पटली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 07:04 PM2022-12-10T19:04:08+5:302022-12-10T19:04:08+5:30
पिंपरी-चिंचवड चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाली होती...
- रोशन मोरे
पिंपरी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. शाई फेकणाऱ्याचे मनोज गरबडे असे नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरात परिचित आहे.
मनोज हा पिंपरी-चिंचवड परिसरात समता सैनिक दलासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. डाॅ. बाबाासहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाकडून आयोजित कारण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्याचा पुढाकार असतो. नुकतीच मनोजच्या पुढाकाराने पिंपरीत संविधात जनजगृती अभियान तसेच सहा डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मनोज सोबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन जणांची चौकशी पोलीस चौकशी सुरू आहे.
चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य काय केले होते?
पैठणमध्ये शुक्रवारी कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली, असे विधान केले. शाळा सुरू करताना तुम्ही सरकारी अनुदानावर अवलंबून का राहता? डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे ते म्हणाले. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच पाटील यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे स्पष्टीकरण दिले.
पिंपरी-चिंचवडमध्ये उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक#ChandrakantPatilpic.twitter.com/RZ08pAT5GI
— Lokmat (@lokmat) December 10, 2022