Pune Crime: टेलिग्रामवर ओळख, पार्टटाइम कामाच्या आमिषातून सव्वापाच लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: May 11, 2024 17:48 IST2024-05-11T17:47:52+5:302024-05-11T17:48:12+5:30
पुणे : टेलिग्रामवर ओळख करून घेत पार्टटाइम नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. तसेच दिलेले काम पूर्ण केल्यास दिवसाला ८०० ते ...

Pune Crime: टेलिग्रामवर ओळख, पार्टटाइम कामाच्या आमिषातून सव्वापाच लाखांचा गंडा
पुणे : टेलिग्रामवर ओळख करून घेत पार्टटाइम नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. तसेच दिलेले काम पूर्ण केल्यास दिवसाला ८०० ते ४ हजार रुपये कमावता येतील, असे आमिष दाखवून तरुणाला तब्बल ५ लाख ३२ हजार रुपयांना गंडा घातला गेला आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश उत्तम बांगडे (वय २८, रा. नऱ्हे) याने पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी यादरम्यान घडला. तक्रारदार तरुणाला अनोळखी मोबाइलवरून मेसेज आला. बंगळुरूहून एचआर निकिता पटेल बोलत असल्याचे भासवले. पार्टटाइम जॉब, वर्क फ्रॉम होम देण्याचे सांगून तरुणाला टेलिग्राम डाऊनलोड करण्यास सांगितले. टास्क पूर्ण केल्यास दिवसाला ८०० ते ४००० रुपये मिळतील, असे सांगितले.
सुरूवातीला ४९ हजार ४१६ रुपये मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्रीपेड टास्कच्या नावाखाली एकूण ५ लाख ३२ हजार रुपये उकळले. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार करत आहेत.