इडली दिन : पुण्यातले हे हाॅटेल आहेत इडलीसाठी फेमस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 03:46 PM2019-03-30T15:46:02+5:302019-03-30T15:48:41+5:30

30 मार्च हा दिवस इडली दिन म्हणून साजरा केला जाताे. इडलीचा उगम हा साधारण इस 800 ते 1200 या काळातील आहे. या पदार्थाचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आढळून येताे.

Idli day: these hotels of pune famous for idli | इडली दिन : पुण्यातले हे हाॅटेल आहेत इडलीसाठी फेमस

इडली दिन : पुण्यातले हे हाॅटेल आहेत इडलीसाठी फेमस

googlenewsNext

पुणे : सकाळी नाश्ता काय करायचा असा प्रश्न पडल्यावर हमखास उत्तर सापडतं ते म्हणजे इडली. इडली हा पदार्थ नाश्त्यात खाण्याची जुनी परंपरा आहे. करायला साेपी आणि चटकण खाता येणारी असल्याने इडलीला नाश्त्यासाठी प्राथमिकता दिली जाते. 30 मार्च हा दिवस इडली दिन म्हणून साजरा केला जाताे. इडलीचा उगम हा साधारण इस 800 ते 1200 या काळातील आहे. या पदार्थाचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आढळून येताे. 

इडली हा आपण साऊथ इंडियन पदार्थ म्हणून ओळखताे. परंतु इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. इडली सारखाच पदार्थ अरब देशांमध्ये देखील तयार केला जात असे. आणि ताे वेगवेगळ्या चटण्यांसाेबत खायला जात असे. त्यावर विविध प्रयाेग करुन आज आपण जी इडली खाताे ती तयार झाली असावी असा अंदाज लावला जात आहे. 

पुण्यात जसजसे भारतातील विविध प्रदेशातून नागरिक येऊ लागले, तसतसे त्या भागातले पदार्थ सुद्धा पुण्यात आले. पुण्यातही इडलीली माेठी मागणी आहे. सकाळच्या नाश्त्याला इडलीलाच प्राधान्य दिले जाते. पुण्यात ठिकठिकाणी इडलीसाठी प्रसिद्ध असणारी हाॅटेल्स आहेत. आज जर तुम्ही इडली खाण्याचा प्लॅन करणार असाल तर पुण्यातील या हाॅटेल्सचा नक्की विचार करा. 

विश्व हाॅटेल - सारसबागेजवळ इडलीसाठी विश्व हाॅटेल फेमस आहे. याठिकाणी मिळणारी इडली माेठ्या आकाराची असते. इथली चटणी उत्तम असते. वाफाळलेली इडली खवय्यांना दिली जाते. राेज सकाळी पुणेकर येथे गर्दी करतात. 

अप्सरा - हिराबाग चाैकात अप्सरा हाॅटेल आहे. इथली इडली आणि चटणी दाेन्ही फेमस आहे. जुने पुणेकर आजही आवर्जुन अप्सरामध्ये इडली खाण्यासाठी जातात.

कल्पना- सारसबागेजवळच कल्पना हाॅटेल आहे. या ठिकाणी इडली साेबत मिळणारे सांबर उत्तम असते. पारंपारिक दक्षिणात्य पद्धतीने हे सांबर तयार केले जाते. कल्पना हाॅटेल देखील इडली खाण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. 

अमृतेश्वर - नळस्टाॅपजवळ अमृतेश्वर नावाचे छाेटेखानी हाॅटेल आहे. दिवसभर तुम्हाला इथे इडली मिळणे अवघड आहे. परंतु तुम्ही जर पहाटे येथे आलात तर तुम्हाला चवदार इडली येथे खायला मिळेल. नुसती इडलीच नाही तर इडली फ्राय देखील तुम्ही येथे खाऊ शकता. तरुणांची पहाटे याठिकाणी माेठी गर्दी असते. इडली बराेबरच उडीद वडा देखील फेमस आहे. 

रस्सम इडली - आपटे राेडला खास दक्षिणात्य पदार्थ मिळणारं रस्सम इडली नावाचे हाॅटेल आहे. या ठिकाणी माेठ्या अकाराची आणि लुसलुशीत अशी इडली मिळते. त्याबराेबर मिळणारे सांबर देखील उत्तम असते. 

Web Title: Idli day: these hotels of pune famous for idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.