पुण्यात तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपतमध्ये स्थापना होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 04:00 PM2021-09-21T16:00:19+5:302021-09-21T16:15:36+5:30

२६ सप्टेंबरला भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थित पानिपत येथे मूर्ती बसवणार आहे.

The idol of Chhapati Shivaji Maharaj made in Pune will be installed in Panipat | पुण्यात तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपतमध्ये स्थापना होणार

पुण्यात तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपतमध्ये स्थापना होणार

Next
ठळक मुद्दे३५० पेक्षा जास्त वर्ष होऊनही आज आपल्या सर्वांच्या मनात महाराजांचं अस्तित्व अबाधित

भोर : पुण्यातील भोर शहरात छञपती शिवाजी महाराजांची राजदंड हाती घेऊन सिंहांसनावर बसलेली मूर्ती तयार केली असून हरियाणाच्या पानिपतमध्ये ती विराजमान होणार आहे. भोर शहरातील चौपाटी येथे मुर्तीचे पुजन करुन स्वागत करण्यात आले. यावेळी शिवभक्त उपस्थित होते.२६ सप्टेंबरला भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीत पानिपत येथे मूर्तीची स्थापना  होणार आहे.

सोमवार दि २० सप्टेंबर,२०१ हा दिवस समस्त भोरवासीयांनी इतिहासात नोंद करून ठेवला. निमित्त होते हरियाणा पानीपत स्थित आपल्या रोड मराठा समाजविषयीची नाळ घट्ट करण्याचे. त्यांचे महाराज आणि समस्त मराठा समाजाप्रती असलेले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा पाहून भोरमधील समस्त शिवप्रेमींनी एक अनोखा उपक्रम करण्याचे ठरविले. आपलं नात पिढ्यानपिढ्या असच रहावं या उद्देशाने हरियाणा, पानीपत येथील रोड मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहसनावरील मूर्ती शिल्पकार दिपक थोपटे यांच्याकडून बनवून घेतली. याकामी भोरमधील मराठयासह इतर समाजातील अनेक दानशूर व्यक्ती पुढे आल्या. सोबत शिवकार्यासाठी तळमळीने अविरत कार्य करणारे शेकडो शिवभक्त या सर्वांच्या मदतीने मुर्ती बनवली आहे.

शिवस्वराज्यभूमी भोर मावळ प्रांत छत्रपतींनी ज्या रायरेश्वरावर शंभू महादेव आणि याच भागातील मावळ्यांच्या साक्षीनं स्वराज्यच स्वप्न बघितलं आणि ते सत्यात उतरवलं. आज ३५० पेक्षा जास्त वर्ष होऊनही आज आपल्या सर्वांच्या मनात महाराजांचं अस्तित्व अबाधित आहे. राजगड, तोरणा, रोहिडेश्वर, केंजळगड त्याबरोबरच अनेक मावळे याच भोर वेल्ह्याच्या मातीतून तयार झाले आहेत. याच प्रांतातून ज्या ठिकाणी मराठयाच रक्त सांडलं, जिथं लढाई हरून सुद्धा मराठ्यांचा उद्धार आजही जगात अभिमानाने होत आहे, अशा पानिपत (हरियाणा)मध्ये अखंड हिंदुस्थानाचे दैवत आणि स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवण्यात येणार आहे. महाराजांच्या मूर्तीची शहरात स्वागत करुन मूर्ती पानिपतकडे रवाना झाली. २६ सप्टेंबरला भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थित पानिपत येथे मूर्तीची स्थापना होणार आहे.

Web Title: The idol of Chhapati Shivaji Maharaj made in Pune will be installed in Panipat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.