आसखेड येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचे कलशारोहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:16 AM2021-09-04T04:16:04+5:302021-09-04T04:16:04+5:30
मंदिराच्या सभामंडपासाठी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या खासदार निधीतून सहा लाख रुपये तसेच माजी आमदार कै. सुरेशभाऊ गोरे ...
मंदिराच्या सभामंडपासाठी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या खासदार निधीतून सहा लाख रुपये तसेच माजी आमदार कै. सुरेशभाऊ गोरे यांच्या आमदार निधीतून ७ लाख रुपये निधी मिळाला होता. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून तीन लाख रुपयांचा निधी उर्वरित कामांसाठी प्राप्त झाला होता.
मंदिराचे बांधकाम चालू करतेवेळी गावातील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक जाहीर झाली. सर्व गावाकऱ्यांनी एकत्र बसून सोसायटी बिनविरोध करून अकरा संचालकांनी प्रत्येकी एक लाख रुपये असे एकूण ११ लाख रुपयांचा निधी उभा केला होता. याचबरोबर गावातील इतर ग्रामस्थांनी व समाजातील दानशूर व्यक्तींनीसुद्धा आपापल्या इच्छेनुसार देणगी देऊन मंदिर उभारणीस हातभार लावला.
पहिल्या मजल्यावर मंदिर आणि तळमजल्यावर १ हजार ५०० चौरस फुटांचा बहुपयोगी हॉल सुमारे ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे.
मंदिरामध्ये मारुती, गणेश, विठ्ठल रखुमाई व दत्तात्रय या देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
गेली चार पाच वर्षे मंदिराचे काम सुरू होते. गेल्या वर्षी काम पूर्ण झाले होते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कलशारोहण कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे कोरोनाचे नियम पाळून हा सोहळा पार पाडण्यात आला.
--
फोटो क्रमांक : ०३ आसखेड मंदिर
फोटो ओळी : आसखेड (खेड) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभे केलेले मंदिर.