संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:47+5:302021-03-05T04:10:47+5:30

नीरा शहरामधील चर्मकार समाजातील थोडक्या लोकांत श्री संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमापूजन करून आरती केल्यावर पुष्प अर्पण करत जयंती साजरी ...

Idolatry on the occasion of Sant Rohidas Maharaj's birth anniversary | संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

googlenewsNext

नीरा शहरामधील चर्मकार समाजातील थोडक्या लोकांत श्री संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमापूजन करून आरती केल्यावर पुष्प अर्पण करत जयंती साजरी केली.

श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्सव व वधूवर परिचय मेळाव्या राधाकृष्ण मंगल कार्यालयात दरवर्षी आयोजित केला जातो. सध्या कोरोनाचा प्रसार वाढता असल्याने रेशमगाठी वधूवर परिचय मेळावा रद्द करून फक्त प्रतिमापूजन करण्यात आले. महिलांनी रोहिदास महाराजांची आरती करत फुले वाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. उत्तम आगवणे यांनी केले. मयुरी आगवणे, मंगल आगवणे, बाळासाहेब भोसले यांनी रोहिदास महाराजांविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी नीरा शहर अध्यक्ष सूर्यकांत कांबळे, नाना डोइफोडे, दत्तात्रय कांबळे, अमोल कांबळे आदी उपस्थित होते. वर्षा कांबळे यांनी कविता सादर केली. सूत्रसंचालन शिल्पा अडसूळ यांनी केले तर आभार चंपकलाल अडसूळ यांनी मानले.

Web Title: Idolatry on the occasion of Sant Rohidas Maharaj's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.