गावकऱ्यांवर कारवाई न केल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव

By admin | Published: March 27, 2016 03:01 AM2016-03-27T03:01:48+5:302016-03-27T03:01:48+5:30

त्र्यंबकेश्वर मंदिरात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना येथील स्थानिक महिला व गावकऱ्यांनी माझ्यासह भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, गोंधळ घातला.

If action is not taken against the villagers, then the chief minister will be arrested | गावकऱ्यांवर कारवाई न केल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव

गावकऱ्यांवर कारवाई न केल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव

Next

पुणे : त्र्यंबकेश्वर मंदिरात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना येथील स्थानिक महिला व गावकऱ्यांनी माझ्यासह भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, गोंधळ घातला. पोलिसांनी गावकऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित असताना, उलट आम्हालाच ताब्यात घेऊन मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले. गोंधळ घालणाऱ्या गावकऱ्यांवर कारवाई न केल्यास, भूमाता ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी येथे दिला.
शेती महामंडळ कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२९) रोजी महिलांचा महामोर्चा आयोजित केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी देसाई यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुरुषांप्रमाणेच महिलांनादेखील प्रवेश मिळावा, या उद्देशाने आंदोलन केले. त्र्यंबकेश्वर येथे स्थानिक महिला व पुरुषांनी पुन्हा त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश केल्यास, आम्ही पाहून घेऊ, मारहाण करण्याच्या धमक्या दिल्या. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना, पोलिसांकडून उलट आमच्यावर कारावई केली जाते. मंदिरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जाते.
- तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

Web Title: If action is not taken against the villagers, then the chief minister will be arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.