कोरोनाबाधित बाहेर फिरत असतील तर गुन्हा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:29+5:302021-04-20T04:12:29+5:30

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत डोंगर दऱ्या-खोऱ्यांमध्ये असणारी गावे कोरोना हाॅटस्पाॅट झाली आहेत. या गावांपैकी तळेघर, जांभोरी, ...

If the coroners are out and about, they will file charges | कोरोनाबाधित बाहेर फिरत असतील तर गुन्हा दाखल करणार

कोरोनाबाधित बाहेर फिरत असतील तर गुन्हा दाखल करणार

Next

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत डोंगर दऱ्या-खोऱ्यांमध्ये असणारी गावे कोरोना हाॅटस्पाॅट झाली आहेत. या गावांपैकी तळेघर, जांभोरी, राजपुर, गाडेवाडी, कोंढवळ या गावांमध्ये घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदाप पवार यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी पोलीस पाटील, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत कडक सूचना केल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तळेघर येथे ३२ रूग्ण, कोंढवळ येथे २४ रूग्ण, राजपूर २० रूग्ण जांभोरी येथे १५ रुग्ण व फलोदे ९ रूग्ण अशी मागील आठवड्यामध्ये तळेघर प्राथमिक केंद्रा अंर्तगत १२६ कोरोणा रुग्ण मिळाल्याने या मधील काही गावे हॉटस्पॉट झाली आहेत.

या अनुषंगाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊची गरज, महत्व, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क वापर याबाबत जनजागृती करा. गावांमध्ये लग्नसोहळे, दशक्रिया विधी आदी कार्यक्रमांमध्ये शासन नियमांपेक्षा जास्त गर्दी होत असल्यास पोलीस ठाण्यास संपर्क साधून माहिती द्यावी. पंच्चेचाळीस वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे आदी सुचना संबंधित पोलीस पाटलांना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिल्या.

या प्रसंगी पोलीस हवालदार शरद कुलवडे, जेष्ट पोलीस पाटील उत्तम वाघमारे, गाडेवाडी येथिल सतिश भोते, तळेघरचे संतोष भवारी, कोंढवळ येथील सुभाष कारोटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ई मेल करत आहे.

--

फोटो क्रमांक : १९तळेघर पोलिस पाहणी

फोटो ओळी : कोरोनाबाधीत गावांना भेट देऊन पाहणी करताना घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप पवार

Web Title: If the coroners are out and about, they will file charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.