मतभेद टाळल्यास गावाचा विकास झपाट्याने होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:04+5:302021-08-01T04:12:04+5:30
--------------------------------------------- कान्हूरमेसाई : लोकांमध्ये काम करण्याची मोठी ताकद आहे, मात्र योग्य दिशा दाखवणारे नाहीत समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माणसाची ...
---------------------------------------------
कान्हूरमेसाई : लोकांमध्ये काम करण्याची मोठी ताकद आहे, मात्र योग्य दिशा दाखवणारे नाहीत समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माणसाची खरी गरज आहे. गावातील हेवेदावे मतभेद विसरून एका विचाराने काम केल्यास गाव विकासापासून मागे राहणार नाही असे प्रतिपादन रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शेखरदादा पाचुंदकर पाटील यांनी केले.
कान्हुर मेसाई येथे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून व रांजणगाव गणपती जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सदस्या स्वातीताई पाचुंदकर पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन निधीतून विविध कामांचे भूमीपूजन झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी दत्तात्रय पाचुंदकर शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती आबा कोहकडे, विद्याधाम प्रशालाचे माजी अध्यक्ष भास्करराव पुंडे, किसान सेलचे सुधीर पुंडे दत्तात्रेय टेमगिरे, सरपंच चंद्रभागा खर्डे, नलिनी खर्डे, बंडू पुंडे, दिपक तळोले, मनोज शिंदे ग्राम विकास अधिकारी के बी घासले, गणेश धुमाळ, सुदाम तळोले, आबिद तांबोळी, विकास पुंडे, योगेश पुंडे, शांताराम जिते, संजय शितोळे उपस्थित होते.
पाचुंदकर म्हणाले की, आपला गाव समाज देश पुढे घेऊन जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला मार्ग आपोआप सापडेल सध्या सुरू असलेली शिक्षण पद्धती चुकीची असून मुलांना त्यांच्या चुका आणि त्यावर उपाय शिकवले तर पुढची पिढी यशस्वी होईल यासाठी गावाने एकीने विचार करावा.
--
चौकट
कान्हुरमेसाई ते मांदळेवाडी - लोणीरस्ता सुधारणे ५० लाख, कान्हूरमेसाई २३ ते रा.म. क्रमांक १०३ पुंडेलवन वस्ती रस्ता (३०लाख) या कामाच्या भूमिपूजन झाले.
--
फोटो क्रमांक :
फोटो ओळी : कान्हूरमेसाई (ता शिरूर) येथील कान्हूरमेसा ते मांदळेवाडी रस्त्याचे भूमिपूजन करताना माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर दादा पाचुंदकर पाटील व ग्रामस्थ