ताप, पुरळ गोवरचे लक्षण असेल, डॉक्टरांना दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:56+5:302021-08-21T04:14:56+5:30

डमी स्टार १०७५ पुणे : गोवर आणि रूबेलावर आता ब-यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आले असले, तरी आता हा आजार ...

If fever, acne is a symptom of measles, see a doctor | ताप, पुरळ गोवरचे लक्षण असेल, डॉक्टरांना दाखवा

ताप, पुरळ गोवरचे लक्षण असेल, डॉक्टरांना दाखवा

Next

डमी स्टार १०७५

पुणे : गोवर आणि रूबेलावर आता ब-यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आले असले, तरी आता हा आजार लहान मुलांसोबत मोठ्यांमध्येही आढळून येत आहे. त्यामुळे कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ताप आणि पुरळ असल्यास ते गोवर किंवा रूबेलाचे लक्षण असू शकते. त्यामुळे तातडीने डॉक्टरांना दाखवणे आवश्यक असते. जिल्ह्यात गेल्या एक वर्षामध्ये ८०,८४१ लहान मुलांना एमआर लसीकरण करण्यात आले आहे.

रुबेला किंवा जर्मन गोवर हा रुबेला विषाणूमुळे होणारा आजार आहे. आजारामध्ये मुलांना ताप, त्वचेवर चट्टे उठणे अशी लक्षणे दिसतात. रुग्ण शिंकल्यास अथवा खोकल्यास त्यातून इतरांना संसर्ग होऊ शकतो. विशेषत: मुले आणि गर्भवती महिलांना रुबेलाचा जास्त धोका असतो. आजाराची लागण झाल्यावर ७ ते १० दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. रुबेला विषाणूचा प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. तसेच, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना या आजाराचा जास्त धोका असतो, असे जनरल फिजिशियन डॉ. रोहित इंगळे यांनी सांगितले.

गरोदरपणात रुबेला आजार झाला तर होणा-या बाळाला जन्मजात व्यंग, मोतीबिंदू होऊ शकतो किंवा सी.आर.एस. हा आजार होऊ शकतो. काही रक्त तपासण्यांच्या आधारे गोवर, रुबेलाचे निदान करता येते. गोवर आणि रुबेलाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नोव्हेंबर २०१८ पासून ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना एमआर लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली. गोवर, गालगुंड आणि रुबेला यांच्यापासून संरक्षणासाठी संयुक्त लस दिली जाते.

---------------------

वर्ष लसीकरण

२०१८-१९ ७३,९४०

२०१९-२० ८५,५६०

२०२०-२१ ८०,८४१

Web Title: If fever, acne is a symptom of measles, see a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.