कचरा टाकल्यास परवाना रद्द, आरोग्य विभागाने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:19 AM2017-11-24T01:19:01+5:302017-11-24T01:19:04+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावरील मदनवाडी गावाच्या हद्दीत असणा-या सर्व्हिस रोडवर होत असलेल्या कच-याच्या समस्येबाबत बातमीवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच आरोग्य विभागाने याची दखल घेऊन या परिसरातील ढाबेचालक व हॉटेलचालकांना नोटीस काढू कचरा टाकल्यास व्यवसाय परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तंबी दिली आहे.
भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील मदनवाडी गावाच्या हद्दीत असणा-या सर्व्हिस रोडवर होत असलेल्या कच-याच्या समस्येबाबत बातमीवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच आरोग्य विभागाने याची दखल घेऊन या परिसरातील ढाबेचालक व हॉटेलचालकांना नोटीस काढू कचरा टाकल्यास व्यवसाय परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तंबी दिली आहे. लोकमतच्या बातमीमुळेच हे शक्य झाल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.
उजनी धरणाच्या काठावर असणाºया या सर्विस रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत होते. या कचºयात हॉटेलमधील शिळे पदार्थ तसेच इतर दुर्गंधीयुक्त पदार्थांचे प्रमाण असल्यामुळे याठिकाणी वातावरणात दुर्गंधी पसरत होती. या खाद्यापदार्थांवर ताव मारण्यासाठी डुकरे आणि भटकी कुत्री मोठ्या प्रमाणावर जमत होती. तसेच आपसात होत असलेल्या भांडणातून महामार्गावर आल्यामुळे या मुक्या प्राण्याला वाहनाखाली येत जीव गमवावा लागत होता. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच यातील काही भाग उजनीच्या पाण्यात जात असल्यामुळे पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत होती. याविषयी २२ तारखेच्या अंकात ‘लोकमत’ने प्रकाश टाकत समस्येबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. तर मॉर्निंगवॉकसाठी येणाºया संतोष सोनवणे, नाना मारकड, नितीन चितळकर, संपत बंडगर, काशिनाथ सोलनकर यांनी लोकमतचे आभार मानले.
>नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर ‘लोकमत’ प्रकाश टाकत असल्यामुळे न्याय मिळत असल्याची भावना प्रसिद्ध बांधकाम उद्योजक नानासाहेब बंडगर यांनी व्यक्त केली. तसेच या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत लोकमतने घेतलेली दखल वाखाणण्या जोगी असल्याचे सांगितले.
विभागाने संबंधितांना नोटीस देऊन कचरा न टाकण्याबाबत सूचना दिल्या. नोटिशीमध्ये लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा हवाला देत सर्व्हिस रस्त्यावर कचरा टाकल्यास व्यवसाय परवाना रद्द करण्याची तंबी दिली.