उद्योगपतींना मारहाण होत राहिल्यास इंदापुरातून कंपन्याच पळून जाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:43+5:302021-06-30T04:08:43+5:30

-- इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील प्रसिद्ध उद्योजक अशोक जिंदाल यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी ...

If the industrialists continued to be beaten, the company would run away from Indapur | उद्योगपतींना मारहाण होत राहिल्यास इंदापुरातून कंपन्याच पळून जाती

उद्योगपतींना मारहाण होत राहिल्यास इंदापुरातून कंपन्याच पळून जाती

Next

--

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील प्रसिद्ध उद्योजक अशोक जिंदाल यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आम्ही रीतसर तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र, अशा पद्धतीने उद्योजकांना मारहाण झाली, तर इंदापूर तालुक्यातील कंपन्या येथून निघून जातील व त्यामुळे इंदापूरचा रोजगार घटेल, अशी भीती अरुण जिंदाल यांनी व्यक्त केली असून मारहाणीच्या निषेधाचे पत्रक प्रसिध्द केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की, आम्ही लोणी देवकर येथील कंपनीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करून कंपनी विस्तृत स्वरूपात वाढवून अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती. परंतु आम्ही या प्रकारामुळे कंपनीचे विस्तार काम थांबवले आहे.

झालेल्या मारहाणीमुळे अशोक जिंदाल यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्या डोळ्याला मोठ्याप्रमाणात इजा झाली आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे महाराज यांच्याबद्दल मला व माझ्या कुटुंबीयांना नितांत आदर आहे.

याचे निवेदन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, देशाचे नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे कठोर कारवाईच्या मागणीसाठी देणार आहे.

Web Title: If the industrialists continued to be beaten, the company would run away from Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.