मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच : रवी परांजपे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 02:17 PM2018-02-02T14:17:54+5:302018-02-02T14:18:15+5:30

सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग आहे संस्कृती. पण हा मार्ग स्वीकारला का? याचे सकारात्मक उत्तर मिळत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच आहे.

If Marathi does not get the status of classical language then the blame is itself: Ravi Paranjpe | मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच : रवी परांजपे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच : रवी परांजपे

Next

पुणे : सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग आहे संस्कृती. पण हा मार्ग स्वीकारला का? याचे सकारात्मक उत्तर मिळत नाही. मराठीला
अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच आहे. अभिजातता केंद्र शासनाकडे मागून घ्यायची गोष्ट नाही. तो दर्जा आम्हालाच सिद्ध करण्याची
गरज आहे. मात्र ही परिस्थिती सध्यातरी दिसत नाही अशा शब्दातं ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी साहित्य संस्थांना टोला लगावला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी 'रत्नाकर पारितोषिक'
मौज दिवाळी अंकासाठी मोनिका गजेंद्रगडकर, रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'ललित' या दिवाळी अंकासाठी अशोक कोठावळे,  'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'समदा' या दिवाळी अंकासाठी संपादिका मनस्विनी प्रभुणे, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'साहित्य शिवार' या दिवाळी अंकासाठी जयराम देसाई यांना देण्यात आले.  त्याच बरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट आॅनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक राम जगताप यांना , 'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाडमयदिवाळी अंकाचे पारितोषिक' वर्षा तोडमल  आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'अक्षर' मधील  'आवर्त' या कथेकरिता विजय खाडिलकर यांना प्रदान करण्यात आले तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'शब्दशिवार' या दिवाळी अंकातील डॉ. रणधीर शिंदे यांच्या 'येडापीसा वारा चिकटलेला जन्मभर तुझ्या देहाला' या लेखाला देण्यात आले.
यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार तसेच ज्योतिषतज्ञ चंद्रकांत शेवाळे
आणि स्पर्धेचे समन्वयक वि.दा पिंगळे उपस्थित होते. परांजपे म्हणाले, ज्या उद्योगधंदयाच्या वाढीसाठी दिवाळी अंकांना जाहिराती मिळतात. त्यावरच आज गदा आली आहे. कलात्मक उद्यमशील अभिजातता उदयास आली असती तर वाचक वाढले असते पण ही कलात्मक अभिजातता वाढली आहे का नाही हे आपण पाहिलेच नाही. कोण म्हणत? आपले साहित्य अभिजात नाही. कमतरता आपल्यातच आहे.
प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकात तेच
ते लेखक वषार्नुवर्षे लिहित असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे. दिवाळी अंकांना जाहिरातीच्या
रूपाने आर्थिक मदत करणे हे समाजातील धनिकांना आपले सांस्कृतिक कर्तव्य वाटत होते. आज ती भावना राहिली नाही. वाचकांच्या अभिरुचीचा पोत
बदलल्यामुळे त्यांना ललित साहित्याचा समावेश असलेल्या दिवाळी अंकांपेक्षा माहितीपर दिवाळी अंकांचे आकर्षण वाटते आहे. वाचनसंस्कृतीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सवर््हेक्षण होण्याची गरज असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मनस्विनी प्रभुणे यांनी  जी लोक दिवाळी अंकांकडे केवळ पैसा कमवण्याच्या हेतूने न पाहाता वाचकांना दर्जेदार साहित्य
वाचायला मिळावे यासाठी दिवाळी अंकांची निर्मिती करण्याची धडपड करीत असतात त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची अपेक्षा  व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वि.दा पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले तर प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

Web Title: If Marathi does not get the status of classical language then the blame is itself: Ravi Paranjpe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे