झेपत नसेल तर महापौरपदाचा राजीनामा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:48+5:302021-06-26T04:09:48+5:30
पुणे : पुण्यातील आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरांवर पुणे महानगरपालिकेने कोणताही विचार न करता, सहानभूती न दाखवता बुलडोझर चालवला. ...
पुणे : पुण्यातील आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरांवर पुणे महानगरपालिकेने कोणताही विचार न करता, सहानभूती न दाखवता बुलडोझर चालवला. महापालिकेने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या. यामुळेच त्यांनी महापौरांचा समाचार घेत, झेपत नसेल तर पुण्याच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
विधानभवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीच्या दरम्यान त्या बोलत होत्या. महापालिकेच्या असंवेदनशील कृतीवर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या. झेपत नसेल तर पुण्याच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे त्यांनी सांगितले.
------