शहराकडे जाण्याचे प्रमाण घटल्यास आत्महत्यांना पायबंद

By admin | Published: October 16, 2015 01:21 AM2015-10-16T01:21:08+5:302015-10-16T01:21:08+5:30

शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो

If the number of people go to the city, | शहराकडे जाण्याचे प्रमाण घटल्यास आत्महत्यांना पायबंद

शहराकडे जाण्याचे प्रमाण घटल्यास आत्महत्यांना पायबंद

Next

पुणे : शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो आणि हतबल होतो. या तरुणांचे शहराकडे जाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आत्महत्यांचे प्रमाणही कमी होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
लायन्स क्लबतर्फे शताब्दीनिमित्त दुष्काळग्रस्त शेतकरी परिवारांना मदतीचा हात देण्यासाठी नाना पाटेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला. या वेळी पाटेकर बोलत होते. याप्रसंगी लायन्स क्लबचे श्रीकांत सोनी, शैैलेश शहा, सतीश देसाई, श्याम अगरवाल, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे आदी उपस्थित होते.
पाटेकर म्हणाले, की मन हेलावून टाकणारी घटना घडली की भावनेचा उद्रेक होतो आणि भूमिका बदलते. औैरंगाबादमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पाहिल्या आणि मन हेलावले. त्यातूनच या चळवळीची सुरुवात झाली.
राजकीय घडामोडींवर, राजकारण्यांच्या नाकर्तेपणावर भाष्य करण्यापेक्षा मदतीचा हात पुढे करणे मला जास्त महत्त्वाचे वाटते.
मदतीतून शेतकऱ्यांना अपंग न करता त्यांना केवळ पाठिंब्याची जाणीव आपण करून द्यायची आहे. शेतकऱ्यांना मदत केली की आपले काम संपत नाही, तर प्रक्रिया सुरू होते. या पाठिंब्याची चळवळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हायला हवी. बळीराजाच्या जमिनीत राहून श्रमदान करायला हवे, असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले.
आयुष्यभर संपत्तीचा संचय करण्यापेक्षा तो गरजूंसाठी खर्च करायला शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा ६७ वर्षांत ते जो बदल घडवून आणू शकले नाहीत, तो आपण सर्व जण मिळून १०-१५ वर्षांमध्ये घडवून आणू शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
(प्रतिनिधी)

Web Title: If the number of people go to the city,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.