‘...तर कांदा स्वस्त धान्य दुकानातून विका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 05:25 AM2017-11-25T05:25:14+5:302017-11-25T05:25:30+5:30

पुणे : कांद्याचे भाव पाडून शेतक-यांचे पैसे मिळू न देणे योग्य वाटत नाही. भाववाढ झाली, तर सरकारने सबसिडी द्यावी. स्वस्त धान्य दुकानांतून कांदा विक्री करावी.

'... if onion is to be procured from the grains store' | ‘...तर कांदा स्वस्त धान्य दुकानातून विका’

‘...तर कांदा स्वस्त धान्य दुकानातून विका’

Next

पुणे : कांद्याचे भाव पाडून शेतक-यांचे पैसे मिळू न देणे योग्य वाटत नाही. भाववाढ झाली, तर सरकारने सबसिडी द्यावी. स्वस्त धान्य दुकानांतून कांदा विक्री करावी. पण शेतक-यांचे नुकसान करू नये, असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘‘भारत हा पूर्वी कापूस आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता. परंतु, बीटी कॉटनमुळे रोगप्रतिकाराची क्षमता वाढली. कीड पडणे थांबले. त्यामुळे देश दुसºया क्रमांकाचा निर्यातदार बनला. मात्र सध्या बीटी कॉटनवरील बोंडअळीची प्रतिकारक्षमता वाढली आहे. त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्राचे कृषी खाते, कापूस क्षेत्रातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि कापूस उत्पादक शेतकरी यांची १७ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये बैठक घेणार आहे.ह्णह्ण
दरम्यान, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकादमीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. नाविन्यपूर्ण कल्पना व कुशल मनुष्यबळ या आघाडीवर देशात आज निराशेचे वातावरण आहे. यात बदल करायचा असेल तर देशभरातील शिक्षणसंस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली. नाविन्यपूर्ण कल्पनांच्या पार्श्वभूमीवर जगातील १२० देशांचा अभ्यास झाला, त्यात भारताचा क्रमांक १०० वा आला. हे बदलण्यासाठी शिक्षणसंस्था प्रयत्न करू शकतात, असेही पवार यांनी सांगितले.
>जरा शहाण्या माणसाबद्दल बोला!
पुण्यात एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले आणि माजी मंत्री यशवंत सिन्हा हे एका व्यासपीठावर आले. या पार्श्वभूमीवर पटोले यांच्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले ‘जरा शहाण्या माणसाबद्दल बोला!

Web Title: '... if onion is to be procured from the grains store'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.