...म्हणून पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्या तरी मला आनंद : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 07:12 PM2019-02-23T19:12:01+5:302019-02-23T19:14:16+5:30
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्या तरी माझी काही हरकत नाही. एखादी धाडसी महिला राज्याची प्रमुख होत असेल तर मला आनंद आहे.त्यामुळे पंकजा यांना माझ्या शुभेच्छा आहेत अशा भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले.
पुणे : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्या तरी माझी काही हरकत नाही. एखादी धाडसी महिला राज्याची प्रमुख होत असेल तर मला आनंद आहे.त्यामुळे पंकजा यांना माझ्या शुभेच्छा आहेत अशा भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले.
इंदापूर येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी मुंडे यांनी बीड येथील सभेत 'मी वाघीण आहे' अशा शब्दांत स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. याच मुद्दयावर बोलताना सुळे म्हणाल्या की, सध्या आगामी निवडणुकीची जोरदार चर्चा राज्यात आहे. अशावेळी सुरु असलेल्या राजकीय घडामोडींची कल्पना सामान्य जनतेला येणे कठीण आहे. त्यामुळे अशावेळी जर कोणी धाडसी महिला राज्याचे नेतृत्व करणार असेल तर मला आवडेल. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्या म्हणाल्या, सरकारच्या अनेक निष्फळ ठरल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले असून हमीभाव देण्यासही ते अपयशी ठरले आहे. भाजप सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे. आता या सरकारला धडा शिकवायची वेळ आली आहे असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.