माणूस मेला तर माती करायलाही पैसे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:33+5:302020-12-17T04:38:33+5:30
जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी ‘पगार आमच्या हक्काचा’, ‘कामगारांना ...
जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी ‘पगार आमच्या हक्काचा’, ‘कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा दिल्या. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
=====
जम्बोमधील वेतन आणि व्यवस्थापनासंबंधी जबाबदारी असलेल्या ‘पीएमआरडीए’चे अधिकारी मात्र निर्धास्त आहेत. पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांच्याशी याविषयावर बोलण्याकरिता संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
==
दिवाळीपुर्वी जम्बोमधील डॉक्टरांनी वेतन मिळत नसल्याच्या तक्रारीवरुन आंदोलन केले होते. त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करित त्यांना वेतन देण्याची व्यवस्था केल्यावर हे आंदोलन मागे घेतले होते. आता पुन्हा परिचारिकांनी आंदोलन केल्याने जम्बो रुग्णालयासमोरील अडचणी अजुनही संपल्या नसल्याचे समोर आले आहे.
=====
दिवाळी गेली वेतनाविनाच
आम्ही सप्टेंबरमध्ये जम्बोमध्ये रुजू झालो होतो. लाईफलाईन संस्थेने पगार न देताच पळ काढला. मेडब्रोने पूर्ण पगार देण्याचे आश्वासन पाळले नाही. ३५ हजार रुपये पगार ठरवून हातामध्ये केवळ दहा ते पंधरा हजार टेकवले जात आहेत. कुटुंब कसे चालवायचे. माणूस मेला तरी त्याच्या मातीसाठीही आमच्याकडे पैसे नाहीत. दिवाळीत बोनस नाही की पगार नाही. पालिकेने आमच्यासाठी दिलेला १२ हजारांचा बोनसही आम्हाला दिलेला नाही. याविरुध्द आवाज उठविला तर आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली जात आहे.
- पुनम शिर्के, परिचारिका