माणूस मेला तर माती करायलाही पैसे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:35+5:302020-12-17T04:38:35+5:30
- सुरेश बजगुडे, वॉर्डबॉय ===== आम्ही कोरोनाच्या रुग्णांवर जीवावर उदार होऊन काम करीत आहोत. आम्हाला दिले जाणारे साहित्य हलक्या ...
- सुरेश बजगुडे, वॉर्डबॉय
=====
आम्ही कोरोनाच्या रुग्णांवर जीवावर उदार होऊन काम करीत आहोत. आम्हाला दिले जाणारे साहित्य हलक्या दर्जाचे आहे. तक्रार न करता आम्ही रुग्णांची सेवा करीत असूनही आम्हाला आमच्याच हक्काचे वेतन दिले जात नाही. याबाबत विचारले तर महिलांनाही विभाग प्रमुख तेजिंदर सिंग हे शिविगाळ करतात. महिलांचाही सन्मान राखला जात नाही. हा अन्याय कितीकाळ सहन करायचा? तीन महिन्यांपासून निम्म्यापेक्षा कमी वेतनात काम करतो आहोत.
- पुजा गडकर, परिचारिका
=====
जम्बोमधील परिचारिकांच्या वेतनाबाबत पीएमआरडीए आयुक्तांशी बोलणे झाले. त्यांनी आमच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. आधी दिलेले पैसे खर्च झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, पालिकेने त्यांना आजवर दिलेल्या पैशांचा हिशोब घेण्यात आला. त्यानंतर डिसेंबरअखेरपर्यंतचे पालिकेच्या हिश्श्याचे साडेसात कोटी रुपये पालिकेने तात्काळ पीएमआरडीएकडे दिले आहेत. हे पैसे त्यांंना वर्ग झाले असून कर्मचा-यांना वेतन मिळेल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका