पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले तर ‘१००’ नंबर डायल करा; डॉ. के. व्यंकटेशम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:13 PM2020-05-27T12:13:35+5:302020-05-27T12:37:58+5:30

कंटन्मेंट झोन वगळता पुणे शहरात सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी

If the police ask you to close the shop, dial '100' number; Dr. K. Venkatesham | पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले तर ‘१००’ नंबर डायल करा; डॉ. के. व्यंकटेशम

पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले तर ‘१००’ नंबर डायल करा; डॉ. के. व्यंकटेशम

Next
ठळक मुद्देनियोजित वेळेत दुकाने बंद करण्याबाबतचे कुठलेही आदेश पोलिस यंत्रणेला दिले नसल्याचे स्पष्ट

पुणे : कंटन्मेंट झोन वगळता पुणे शहरात सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिलेली आहे़. त्यामुळे या वेळेत पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितल्यास, दुकानदारांनी थेट ‘ १००’ नंबर डायल करावा व संबंधित पोलिसांची तक्रार करावी़ असे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. 
पुणे शहरात पुणे महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, कंटन्मेंट झोन वगळता अन्य भागातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. असे असताना सुध्दा उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी, दुकानदारांंना दुपारीच दुकाने बंद करण्याबाबत जबरदस्ती करीत आहेत. याबाबत मध्यंतरी काही दुकानदारांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणूनही दिली होती. तेव्हा महापालिका आयुक्तांनी पोलिस आयुक्तांशी बोलून, पोलिस यंत्रणेकडून दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे सांगितले होते. तसेच सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने बंद करण्यात येऊ नये असेही स्पष्ट केले होते. 
पंरतु, अद्यापही स्थानिक पातळीवर पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी दुकानदारांना दुकाने बंद करण्याबाबत जबरदस्ती करीत असून, तसे न केल्यास कायदेशीर कारवाईची भितीही घालत आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे स्पष्ट करून, नियोजित वेळेत दुकाने बंद करण्याबाबतचे कुठलेही आदेश पोलिस यंत्रणेला दिले नसल्याचे स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टसिंगचे पालन करून, प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीत दुकाने उघडी असतील, व या ठिकाणी कोणी पोलिस अधिकारी अथवा कर्मचारी दुकान बंद करण्याची जबरदस्ती करीत असेल तर संबंधित दुकानदाराने थेट १०० नंबर डायल करून तक्रार करावी असे सांगितले आहे. 
---------------------------

Web Title: If the police ask you to close the shop, dial '100' number; Dr. K. Venkatesham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.