शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच

By admin | Published: April 26, 2017 03:57 AM2017-04-26T03:57:57+5:302017-04-26T03:57:57+5:30

काँग्रेस पक्षाकडे संख्याबळ आणि ताकद नसल्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार देण्याचा विचार करता येत नाही. मात्र, सर्वसंमतीने

If Sharad Pawar becomes the President, Anandacha | शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच

शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच

Next

पुणे : काँग्रेस पक्षाकडे संख्याबळ आणि ताकद नसल्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार देण्याचा विचार करता येत नाही. मात्र, सर्वसंमतीने निर्णय होऊ शकतात. महाराष्ट्रातील माणूस राष्ट्रपतिपदाचा दावेदार झाल्यास चांगलेच आहे. विशेषत: शरद पवार राष्ट्रपती झाल्यास माझ्या सारख्याला अधिकच आनंदच होईल, असे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबार केला. त्याबाबत शिंदे म्हणाले, ‘जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याच्या दोन-तीन घटना यापूर्वी घडल्या आहेत. संवेदनशील भागाची टेहळणी हेलिकॉप्टरच्या साह्याने करण्यात यावी, असा निर्णय मी गृहमंत्री असताना घेतला होता. सुकमा भागात नक्षलवादी रात्रंदिवस कार्यरत असतात आणि स्थानिकांना सामील करून घेण्याच्या प्रयत्न करतात. त्या भागात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी एकत्रितपणे मोहीम आखली पाहिजे.(प्रतिनिधी)

Web Title: If Sharad Pawar becomes the President, Anandacha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.