शरद पवारांनी योग्य वेळी काळजी घेतली असती तरी देखील चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By राजू हिंगे | Published: January 7, 2024 06:04 PM2024-01-07T18:04:03+5:302024-01-07T18:04:53+5:30

लोकसभा आणि विधानसभेत प्रंचड मोठा विजय महायुतीला मिळणार

If Sharad Pawar had taken care at the right time the picture would have been different; Devendra Fadnavis' troupe | शरद पवारांनी योग्य वेळी काळजी घेतली असती तरी देखील चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

शरद पवारांनी योग्य वेळी काळजी घेतली असती तरी देखील चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

पुणे:  देवेंद्र फडणवीस आता टीव्हीवर दिसत नाहीत. अजितदादा दिसतात, मुख्यमंत्री तर रोजच दिसतात. पण आधीसारखे देवेंद्र फडणवीस दिसत नाहीत, अशा चिमटा सुप्रिया सुळे घेतला होता. त्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, माझी जेवढी काळजी खासदार सुप्रिया सुळे करतात. त्यांच्या दहा टक्के काळजी योग्य वेळी केद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली असती तरी देखील चित्र वेगळे राहिले असते असा शब्दांत त्यांनी टोला लगावला. पुणे शहर भाजपच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळिक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ , महिला आघाडीच्या प्रमुख हर्षदा फरांदे आदी उपस्थित होते. त्यावेळी ते पत्रकाराशी बोलत होते. 

पुणे भाजपने शहर कार्यालय चांगले तयार केले आहे. चांगले कार्यालय झाले तसे भाजपचे पुण्यातही काम चांगले आहे. लोकसभा आणि विधानसभेत प्रंचड मोठा विजय महायुतीला मिळले असे सांगुन देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्याचा गृहमंत्री होता. तेव्हा राज्यात आलबेल होते. आंबानीच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता. त्यावेळी गृहमंत्र्यावर शंभर कोटीचे आरेाप होत नव्हते. साक्षीदाराची हत्या होत नव्हती. अतिशय चांगले काम केले जात होते. त्यामुळे आता यावर काय उत्तर दयायचे अशा उपरोधिक शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या राज्यात गुन्हेगारी वाढलेल्या टिकेला उत्तर दिले आहे. 

भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांनी पोलिस शिपायाला कानाखाली मारली याबाबत त्याबाबत गृहखात्याचे प्रमुख म्हणून ठोस कारवाई करणार का या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुप्रिया ताई सांगतात म्हणून थोडे काही होत असते. जी कारवाई करायची असते ती पोलिसांनी केली आहे. येत्या २२ जानेवारी रोजी काळाराम मंदिरात पुजा करणार असल्याचे शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले, कुठल्या तरी मंदिरात चालले आहे. हे नसे थोडे आहे. उध्दवजी मंदिरात जाण्यास तयार झाले आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला. राममंदिराच्या निमित्ताने अक्षता वाटप आणि अन्य कार्यक्रम सुरू आहे. त्या निमित्ताने भाजपचा घरी जाण्याचा प्रयत्न आहे त्याबाबत फडणवीस म्हणाले, हा भाजपचा कार्यक्रम नाही. हा राम भक्ताचा आणि कार सेवकांचा कार्यक्रम आहे. ज्यांची ज्यांची रामावर श्रध्दा आहे तो चालला आहे. तो अक्षता देत आहे. त्यांच्या बददल कोणालाही दुख होण्याचे कारण नाही.
 
भुमिका पक्की, तुसभरही दुर झालो नाही 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा मेळावा झाला. त्यावेळी बॅनरवर नवाब मलिक यांचा फोटो लावण्यात आला  होता. याबददल विचारले असता देवेद्र फडणवीस म्हणाले,  माझी भुमिका पक्की आहे. जी माझी भुमिका आहे. तीच भाजपची भुमिका आहे. त्यापासुन आम्ही तुसभरही दुर झालाे नाही.

पुरवा दिला तर परिक्षा रदद केली जाईल 

तलाठी परिक्षेतील घोटाळा बाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले,  कॉग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी कुठल्याही पुरवा दिला तर निश्चितपणे चौकशी करण्यात येईल.नुसत्या विधानाने चौकशी करता येत नाही. महाराष्ट्रात एवढया मोठया प्रमाणात परिक्षा पारदर्शकपणे घेत आहे. कुठल्या परिक्षेबाबात कुणीही पुरवा  दिला तर ती रदद केली जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे त्यांनी पुरावा द्यावा. 

बैठकीत संघटनात्मक आढावा घेतला 

आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची बैठक  झाली.त्याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले, नियोजनाची ही बैठक होती.  साधारणपणे अधुन मधुन अशा बैठका घेतो. निवडणुकीपुर्वी अशा बैठका घेतो. ज्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकारी यांची मते ऐकुन घेतली जातात. तयारी करताना काय केले पाहिजे. कोणत्या विषयांना महत्त्व दिले पाहिजे. विशेष संघटनात्म चर्चा असते. राष्ट्रीय संघटन मंत्री आले होते. त्यांनी संघटनेचा आढावा घेतला असे देवेद्र फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: If Sharad Pawar had taken care at the right time the picture would have been different; Devendra Fadnavis' troupe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.